Advertisement

शिवसेना नागपूर- ग्रामीण चे उपजिल्हा प्रमुख श्री.वर्धराज पिल्ले यांनी दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

नागपूर/पारशिवनी: शिवसेना नागपूर- ग्रामीण चे उपजिल्हा प्रमुख श्री.वर्धराज पिल्ले यांनी दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षा प्रमख यांना दिला, पत्राद्वारे राजीनामा

समोरील बाब अशी  कि, आपणास कळवू इच्छितो कि मी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण( रामटेक विधानसभा) या पदावर कार्यरत असून सध्याची राजकीय परिस्थिती बघता सदर जबाबदारी सांभाळण्यास असमर्थ असल्याने आपल्या  पदावरून राजीनामा देत आहे. आपणास विनंती आहे कि, आपण माझा राजीनामा स्वीकारून मला सदर पदावरुन कार्यमुक्त करावे. मी सदैव शिवसैनिक म्हणून कार्य करत राहील.

 

श्री वर्धराज पिल्ले यांचे मनोगत खालीप्रमाणे

महोदय, आपणास माहिती सादर करू इच्छितो कि मी मागील ३७ वर्षापासून एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. मी माझे राजकीय व सामाजिक काम है ३७ वर्षापूर्वी शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून सुरु केले. मी शाखाप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख पर्यंत सर्व जवाबदाऱ्या मी आजपर्यत इमाने इतबारे पार पाडल्या. शिवसेना या चार अक्षराच बळ वापरून अनेक अधिकारी, स्थानिक समाजकंटक, विरोधक यांचेसी प्रसंगी दोन हात करून सामान्य नागरिकांसाठी काम केले. शिवसेनेने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन केले. पक्षाच्या विरोधात आयुष्यात कधी बयानबाजी दिली नाही. पक्ष सांगेल तेच धोरण या एकमात्र भूमिकेवर सदैव काम करत आलेलो आहे.

आपणास सांगू इच्छितो कि मी वेळोवेळी पक्षाने दिलेल्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार केला त्यांच्या विजयासाठी खारीचा वाटा उचलला आहे. माजी खासदार सुबोध मोहिते यांनी पक्ष सोडल्यानंतर मा. प्रकाश जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्याकाळातही तत्कालीन खासदार सुबोध मोहिते यांना प्रखर विरोध करत, सत्तेची लालसा न बाळगता पक्षाचा उमेदवार म्हणून असलेल्या मा.प्रकाश जाधव यांचा प्रचार केला व त्यांच्या विजयातही खारीचा वाटा उचलला. अनेक नेते येत गेले पद उपभोगत गेले आमच्यासारख्या स्थानिक पदाधिकार्यांवर अन्याय होत गेला तरी आम्ही कधीच या गोष्टीचा उहापोह न करता पक्षाचेच काम करत राहिलो.

मा. आमदार आशिष जैस्वाल हे मागील 20 वर्षापासून आमच्या रामटेक विधानसभेचे आमदार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते सलग ०४ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता जरी त्यांनी वेगळी भूमिका घेतली असे दिसत असले तरी ते नेहमी स्थानिक शिवसैनिकांच्या पाठीसी खंबीरपणे उभे राहिले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढली व काही कारणाने सलग १५ वर्षापासून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार हे पराजित झाले. तरीही पुढील पाच वर्ष जिद्दीने संघर्ष करत मा. जैस्वाल साहेब लढत राहिले. सामान्यांचे काम करत राहिले. २०१९ च्या निवडणुकीत आपण परत युती केली पण रामटेक विधानसभा भाजपच्या कोट्यात गेली. अस्या परिस्थितीतहि शिवसेनेच्याच नेतृत्वात बाळासाहेबांच्या फोटो खाली आम्ही किल्ला लढविला व अपक्ष म्हणून मा.जैस्वाल साहेब निवडून आले व त्याचक्षणी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला. नंतर च्या घडामोडीत आमच्या मतदार संघात मंत्री पदाची आशा आम्हाला होती पण ते मिळू शकले नाही तरी आम्ही खचून न जाता शिवसेनेच्याच नेतृत्वात लोकाभिमुख कार्य करत राहिलो.

यात आता माझे पद सोडण्याचे मुख्य कारण असे कि, इतक्या संघर्षात कार्यकाळ घालविल्या असल्या नंतरही माझे मा.आशिषजी जैस्वाल यांचेसी वैयक्तिक संबध जिव्हाळ्याचे असल्याने राजकीय परिस्थिती उत्पन होता बरोबर माझ्यावर अविस्वास दाखविण्यास सुरुवात झाली. जे आता स्वतला शिवसैनिक म्हणून समोर येत आहेत ते सर्व सत्तेचे पद भोगून नंतरच्या काळात कुठल्या बिळात लपलेले होते याचे उत्तर त्यांनीच द्यावेत.

सततचा अविश्वास व दोन मतप्रवाह यातुन पक्षाचेच नुकसान होत असते व चुकीचा संदेश जात असतो. त्यामुळे पद कोणीही घ्यावे व पक्षाचेच काम करावे त्यात माझ्या उपस्थितीमुळे कोणालाही त्रास होवू नये म्हणून मी आज आपला राजीनामा सादर करत आहे.

याचा अर्थ पक्ष सोडतोय असा होत नसून मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून नेहमी काम करत राहील याची हमी देतो व आपणास विनंती करतो कि मला शिवसेना उपजिल्हाप्रमुख नागपूर-ग्रामीण (रामटेक विधानसभा) या पदावरून कार्यमुक्त करावे व जेष्ठ पदाधिकार्यांच्या सल्ल्याने नवीन कुणाची तरी नियुक्ती करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या