कन्हान परिसरात विविध ठिकाणी लहान मुलांचा तान्हा पोळा सण उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात साजरा
लहान मुलांना खाद्यपदार्थ स्टेशनरी सामग्री वाटप
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरात शनिवार ला विविध ठिकाणी लहान मुलांचा तान्हा पोळा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन लहान मुलांना खाद्यपदार्थ स्टेशनरी सामग्री वाटप करुन उत्सव थाटात साजरा करण्यात आला .

पिपरी कन्हान दुर्गा माता मंदिर चौक
पिपरी कन्हान परिसरातील दुर्गा माता मंदिर चौक येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते लहान मुलांचा नंदी बैलांची पुजा अर्चना करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी लहान मुलांना नमकीन पॅकीट , बिस्कीट वाटप करण्यात आले .

संताजी नगर , कांद्री येथे तान्हा पोळा कार्यक्रम संपन्न
भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान बहुद्देशीय संस्था द्वारे संताजी नगर कांद्री हनुमान मंदिर परिसरात तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे आणि ग्रामपंचायत सदस्या अरुणा हजारे यांनी लहान मुलांचा नंदी बैलांची पुजा अर्चना करुन कार्यक्रमाची सुरवात केली . त्यानंतर मुलांना खाद्यपदार्थ स्टेशनरी सामग्री वाटप करुन तान्हा पोळा उत्सव थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

शितला माता मंदिर कांद्री , कन्हान
परिसरातील राष्ट्रीय महामार्गा वरील शितला माता मंदिर परिसरात लहान मुलांचा सण तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित वसंता राऊत यांनी मंदिरात पुजा अर्चना करुन बाळगोपाळांना शेंदुर लावुन नंदी बैला वर फुलांचा वर्षाव करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . प्रमुख अतिथि डॉ अनिल मंगतानी , कांद्री ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे , पप्पु गुप्ता , चंडीबाबा , अशोक खैरकर , प्रकाश हटवार , बादल विश्वकर्मा , उमेश कुंभलकर , वामन देशमुख , देवचंद झिंगरे , रवि कोटपल्लीवार , गोकुल पटेल , प्रेमचंद चव्हान , महेश मंगतानी यांच्या हस्ते बाळगोपाळांना मिठाई , नमकीन पॅकीट , बिस्कीट पॅकीट वाटप करुन तान्हा पोळा कार्यक्रम संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

येसंबा ग्रामपंचायत प्रांगणा मध्ये तान्हा पोळा कार्यक्रम संपन्न
येसंबा गावात शनिवार ला तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक ग्रामपंचायत प्रांगणा मध्ये करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते नंदी बैलांची पुजा अर्चना करुन व बाळगोपाळांना शेंदुर लावुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमात सोनु वानखेडे यांच्या हस्ते गुडी फिरवुन व बाळगोपाळांना चाॅकलेट , बिस्कीट , फळ वितरित करुन कार्यक्रम संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी सरपंच धनराज हारोडे , ग्रा.पं. सदस्य शिवनारायण चकोले , मनोहर नागपुरे , भागवत महाल्ले , विठ्ठलराव महाल्ले , कार्तिक भोयर , जगदिश भोयर , कुमार गडे , फुलचंद कारोंडे , महेन्द्र कारोंडे , गणेश बांगडे , लोकेश ऊके , हर्षद हारोडे , संजय गजभिये सह आदि गावातील नागरिक व बालगोपाल प्रामुख्याने मोठ्या संख्येत उपस्थित होते.

निर्णय प्रतिष्ठाण शिवनगर येथे तान्हा पोळा कार्यक्रम साजरा
शनिवार ला तान्हा पोळा तारसा रोड निर्णय प्रतिष्ठाण शिवनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रामभाऊ दिवटे व डाॅ.श्रीकृष्ण जामोदकर यांच्या हस्ते लाकडी नंदीची विधिवत पुजा, आरती व लहान मुलांचा खाऊ वाटप करून तान्हा पोळा उत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन निर्णय कुंभलकर व आभार प्रदर्शन ऋषी कोचे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सुर्यभान कुंभलकर व सुशील ठाकरे उपस्थित होते. यावेळी नरेश नाटकर , ज्ञानेश्वर हुड , ऋषी कोचे , निर्णय कुंभलकर , सुनिल सरोदे , शुभम कुंभलकर , मोनिश हुड , कुणाल भोंगाडे , मंमर चकोले , डाॅ.दापुरकर साहेब प्रमुख पाहुणे सुंनदा दिवटे, प्रतीभा कुंभलकर , इंदूबाई कोचे ,पुष्पलता कुंभलकर , जया कुंभलकर , पुजा कुंभलकर , प्रिया कोचे , मोनाताई कोचे , श्वेता दिवटे , अरूणाताई बावनकुळे , त्रिवेणी सरोदे , अक्षय श्रावणकर , कल्पणा श्रावणकर , चंदभान कुंभलकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

अशोक नगर मित्र परिवार द्वारे तान्हा पोळा कार्यक्रम संपन्न
शहरातील अशोक नगर , कन्हान येथे भव्य तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन मनिष धर्मदासजी भिवगडे (नगर सेवक, न.प.कन्हान तथा गटनेता) यांच्या द्वारे करण्यात आले होते. बाळगोपाळां द्वारे परिधान केलेले सर्वोत्कृष्ट वेशभुषा , सर्वोत्कृष्ट नंदी व उत्तम सामाजिक संकल्पना इत्यादी विषयांवर प्रथम , द्वितीय व तृतीय पारितोषिक आणि सहभागी सर्व चिमुकल्यांना प्रोत्साहन बक्षिश वितरण – कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी मा.राजेंद्र मुळक (माजी मंत्री व अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सौ. रिताताई नरेश बर्वे (अध्यक्षा, कन्हान शहर महिला काँग्रेस कमिटी), किशोरजी बेलसरे , अमोल प्रसाद ,अनिल गजभिये , अनिल पाटील , निखिल बागडे , महेश डोंघडे , कुणाल चव्हाण , स्वप्निल नितनवरे , राजिक सिद्दीकी , आशिष गोंडाने , पिंटू चव्हाण , उत्कर्ष आंबागडे , प्रणय भिवगडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कांद्री येथे हनुमान मंदिर परिसरात तान्हा पोळा कार्यक्रम थाटात साजरा
स्थानिय कांन्द्री येथील लहान हनुमान मंदिर जवळ लहान मुलांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला . पोळ्या मध्ये लहान मुलांनी विविध प्रकारे वेषभूषा करून पोळ्या मध्ये सहभाग घेतला सहभागी सर्व लहान मुलांना दुर्गाताई सरोदे ग्रा.पं. सदस्या यांच्या कडून पुस्तके वाटप करण्यात आले.
या वेळेस कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे राजू देशमुख , गणेश सरोदे , अभय जांबूतकर , गजानन हटवार , नंदू मस्के , रोशन बावणे , अंकुश कुंभलकर , तुळशीदास मस्के , आदी ने सहकार्य केले .

गहुहिवरा येथे तान्हा पोळा कार्यक्रम संपन्न
गहु हिवरा येथे तान्हा पोळा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष व गहुहिवरा ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील यांनी नंदी बैलांची विधिवत पूजा अर्चना करून लहान चिमुकल्यांना पेन्सिल, रबर देऊन त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
तसेच परिसरातील ठिकठिकाणी , गावात , लहान मुलांच्या तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन करुन विधिवत नंदी बैलांची पुजा अर्चना करुन लहान मुलांना बिस्कीट, चिप्स व स्टेशनरी वाटप करुन परिसरात दोन दिवसीय पोळा सण उत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .
शहरात व परिसरात कुठल्याही प्रकारची अनुचीत घटना घडु नये म्हणून पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0 टिप्पण्या