Advertisement

आदर्श हायस्कुल द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य मिरवणुक

आदर्श हायस्कुल द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य मिरवणुक

वृक्ष व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राखी बांधुन रक्षाबंधन उत्सव साजरा.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आदर्श हायस्कुल कन्हान द्वारे भारतीय स्वातंत्र्या चा अमृत महोत्सवा निमित्य तारसा रोड चौक ते गांधी चौक, पोलीस स्टेशन पर्यंत मिरवणुक काढुन महात्मा गांधी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित विनम्र अभिवादन करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील रक्षा बंधानाच्या दिवसी पोलीस बांधवांना राखी बांधुन रक्षा बंधन उत्सव ही थाटात साजरा करण्यात आला.


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित गुरूवार (दि.११) ऑगस्ट ला आदर्श हायस्कुल कन्हान द्वारे शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम यांच्या हस्ते भारत माता व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून तारसा रोड चौक ते गांधी चौक पोलीस स्टेशन कन्हान पर्यंत विद्यार्थी, शिक्षकांनी तिरंगा झेंडा उंचावत ” भारत माता की जय ” चा जय घोष करित मुरवणुक काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला संस्थे चे सचिव भरत सावळे यांच्या हस्ते पुष्पहार माल्यार्पण करित विनम्र अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर पोलीस स्टेशन येथे शाळेतील विद्यार्थांना गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस हवालदार जयलाल सहारे हयांनी बंदुक, रायफल शस्त्रा बद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. रक्षाबंधन उत्सवा निनित्य आदर्श हायस्कुल येथील विद्यार्थीनीं वृक्ष संवर्धनास परिसरातील वृक्षाला आणि आपले रक्षणाचे कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राखी बांधली. पोलीस स्टेशन पासुन परतांना प्राथमिक आरोग्य केंद्र पटागंणातील वृक्षाला राखी बांधुन मिरवणुक आर्दश हायस्कुल ला पोहचुन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.

या प्रसंगी आर्दश हायस्कुलचे शिक्षक जी डी यादव, एम एस डोंगरे, टी आर चवरे, एस एस सोलं की, बी टी गेहाणी, प्रिती बोपचे, रेणुका वर्मा, एस एम पेटकर, एस डी वंजारी, ए के नेवारे, अनिता हारगुडे सह विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या