Advertisement

लाडजगावाला पुराणे वेढले गावाचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून शासन दरबारी मागणी

लाडजगावाला पुराणे वेढले गावाचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून शासन दरबारी मागणी

ब्रम्हपुरी -चंद्रपूर जिल्हाच्या शेवटच्या टोकावर ब्रम्हपुरी हा तालुका आहे. लाडज जुनी हे गाव वैनगंगा नदीने पूर्णतः वेढले असून

तालुक्यातील शेवटच्या टोकावर हे गाव आहे. पावसाळा आला की येथील नागरिकात भीतीचे वातावरण तयार होते. लाडज या गावाला वैनगंगा नदीने पुर्णतः वेढले असल्याने पावसाळ्यामध्ये या गावाचे जनजीवन पूर्णतः विस्कळित होऊन तालु्क्यासी या गावाचा संपर्क तुटतो.

यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे लाडज गावात महापूर आला व त्यामुळे गावातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातून लोक सावरत नाहीत तोच आता मागील तीन दिवसापासून पुन्हा या गावाला पुराच्या पाण्याने वेळा दिला आहे.

पुराचे पाणी शेतात व गावात आल्याने शेतमालाचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  परंतु शासन व प्रशासनाची कुठलीही मदत अजूनपर्यंत लोकांना मिळाली नाही.

मागील कित्येक दिवसापासून लाडज गावाचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून शासन दरबारी ग्रामवासी मागणी करीत आहेत परंतु त्याकडे शासन पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे.

तेव्हा आता तरी या समस्या चे निराकरण करून शासन गावकऱ्याची मागणी पूर्ण करेल अशी आशा लाडज वासियांना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या