लोकहीत संघर्ष समितीच्या वतीने आरमोरी नगर परिषदेवर धडक मोर्चा
नगर परिषद कराच्या माध्यमातून करते बेकायदेशीर लुट.
ठिय्या आंदोलनामुळे तणावाच्या परिस्थितीत आरमोरी पोलीसांच्या मध्यस्थीने परिस्थिती आटोक्यात.
आरमोरी नगर परिषदेने बेकायदेशीररित्या अमाप वाढवलेल्या कराच्या विरोधात लोकहीत संघर्ष समितीच्या वतीने शहरातील शेकडो नागरिकांना घेऊन जनतेच्या न्याय हक्कांसाठी रितसर नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला .
मोर्चाची सुरुवात आरमोरी शहरातील वडसा टी पॉईंट येथून दुपारी 1.00 वाजता सुरुवात झाली. या मोर्चामध्ये आरमोरी येथील शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन नगरपरिषदेच्या विरोधात घोषणाबाजी , नारे देत नगरपरिषदेकडे वळविण्यात आले . मोर्चा नगरपरिषद वर धडकल्यांनातर लोकहीत संघर्ष समितीचे सद्स्य राहुल जुवारे, अमोल मारकवार ,निखिल धार्मिक,रंजित बनकर,महेंद्र शेंडे,सुनील नंदनवार,शरद भोयर यांनी मोर्चा काढण्या मागील आपले स्पष्ट मत व्यक्त करून आरमोरीतील जनतेला जाहीर सभेत मार्गदर्शन करण्यात आले.लोकहीत संघर्ष समितीच्या सदस्यांनी मोर्चाचे निवेदन मुख्याधिकारी यांच्या दालनात न घेता प्रत्यक्ष जनतेसमोर निवेदन स्वीकारावे याकरिता मागणी रेटून धरल्याने नाईलाजास्तव मुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारून वाढीव मालमत्ता करावर सुनावणी घेऊन, सूनावणीकरिता लोकहीत संघर्ष समिती सदस्य प्रफुल खापरे यांनी नोटीस देऊन आक्षेप अर्ज केलेल्या नागरिकांना उपस्थित राहण्याची जबाबदारी लोकहीत संघर्ष समिती सदस्यांनी घ्यावी असे उडवाउडवीची उत्तर देऊन मुख्याधिकारी निघून गेल्या . त्यांच्या या बोलण्याने मोर्चाकऱ्यांचे समाधान झाले नाही . नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.त्यांनतर नगराध्यक्ष जोपर्यंत येऊन आपली बाजू स्पष्ट करित नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही अशी तटस्थ भूमिका घेतल्याने नगराध्यक्ष याना सामोरे जावे लागले. त्यांनी याबाबत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , उपमुख्यमंत्री, आमदार आरमोरी याना निवेदन दिले असून मालमत्ता कर कमी करण्याची विंनती केली असल्याचे सांगितले. जोपर्यत नवीन मालमत्ता कराचा निर्णय होत नाही तोपर्यंत नवीन कर घेतले जाणार नाही अशी ग्वाही नागरिकांना देण्यात आली. हा मोर्चा आरमोरीतील सर्व नागरिकांचा असताना देखील आरमोरी जनतेचे निवडून दिलेले नगरसेवक गैरहजर असल्याने जनतेमध्ये मोठ्याप्रमाणात रोष दिसून आला . नगराध्यक्षांने दिलेल्या आश्वासनावर या मोर्चाची सांगता करण्यात आली.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी लोकहीत संघर्ष समितीचे सदस्य अमोल मारकवार, रंजित बनकर,निखिल धार्मिक,राहुल जुवारे,सुनील नन्दनवार ,चंदू वडपल्लीवर ,प्रफुल खापरे, शरद भोयर, शालीक पत्रे, विजय सुपारे, महादेव कोपुलवर, देवानंद दुमाणे,महेंद्र शेंडे,अमीन लालानी, आकाश मडावी, प्रदीप हजारे, विनोद निमजे, संदीप ठाकूर,रिंकू झरकर , विवेक ठाकरे,छाया मानकर, अनंता भोयर , सुरज पडोळे,विभाताई बोबाटे, ज्योती सोनकुसरे, ज्योती घुटके, महानन्दा शेंडे,अजय कुथे, नेपचंद्र पेलणे, दुर्गा सेलोकर,दिलीप घोडाम, राजुभाऊ अंबानी, चुंणीलाल मोटघरे, घनश्याम धकाते ,रमेश मेश्राम ,दशरथ मेश्राम , अंकुश गाढवे,बादल सपाटे, विजय सुपारे आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
गडचिरोली- चक्रधर मेश्राम


0 टिप्पण्या