ब्रम्हपुरी तालुक्यातील जी. प. चे आरक्षण रद्द करा. जिल्हाधिकारी यांना निवेदन
चंद्रपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीची येत्या काही महिन्यात बिगुल वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दि २८ जुलै २०२२ रोजी चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील एकूण ६२ जागेसाठी सोडत काढण्यात आली. सदर आरक्षण सोडतीत ६२ जागे पैकी १४.३ टकके अनुसूचित जाती करीता, ९ जागा आरक्षित केल्या गेल्या तर २१.९ टक्के अनुसूचित जमाती करीता १४ जागा आरक्षित आहेत. आणि ५८.३ टक्के ओ.बी.सी. साठी ८ जागा राखीव आहेत. यावरून ६२ जागा पैकी ३१ जागा आरक्षित प्रवर्गासाठी आरक्षित केल्या तर ओ.बी.सी करीता फक्त ८ जागा राखीव ठेवल्या गेल्या आहेत. यावरून काढण्यात आलेल्या सोडतीतील कमालीची विसंगती असल्याचे दिसून येत असून न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप भा. क.प.नेते विनोद झोडगे यांनी केला आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ जागे करीता आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात १६.६० टक्के अनुसूचित जाती,९.२टक्के अनुसूचित जमाती, तर ७४.९ टक्के ओ.बी.सी असून सहा जिल्हा परिषद क्षेत्रापैकी ५ जागा अनुसूचित जमाती करीता तर एक जागा सर्वसाधारण असे आरक्षण असून त्यामध्येही ४ जागा महिला करीता राखीव केल्या गेल्या. या भागात ओ.बी.सी व अनुसूचित जाती यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आरक्षणात त्या प्रवर्गातील लोकांना प्रतिनिधित्व दिल्या गेले नाही. त्यामुळे या प्रवर्गावर अन्याय केला गेला. दी २८ जुलै २०२२ ला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी काढलेली सोडत तातडीने रद्द करून सर्वांना न्याय व प्रतिनिधित्व मिळेल या हेतूने व संविधानिक हक्क, अधिकार मिळावा यासाठी नव्याने सोडत काढून झालेला अन्याय दूर करावा. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर यांना भा. क. प. नेते कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदन देताना जिल्हा सचिव कॉ .प्रा.नामदेव कंनाके, कॉ रवींद्र उमाटे, कॉ वनिता कुंटावार, कॉ प्रकाश रेड्डी, रमेश रायपुरे हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या