घर कोसळून एक जागीच मृत्यू
ब्रह्मपुरी पासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव भोसले ( शिवाजी चौक ) येथील दोन-चार दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सुधीर गायधने यांचे घर मागच्या बाजूने कोसळले त्यावेळी त्यांचे वडील जेवण करून त्या खोलीमध्ये झोपले होते. त्यांचेवर भिंत कोसळल्याने रामचंद्र तुळशीरामजी गायधने यांचा जागीच मृत्यू झाला.घराशेजारील लोक वेळीच आले व त्यांचा प्रेत बाहेर काढण्यात आला.
नंतर संबंधित शासकीय अधिकारी, पोलीस स्टेशन येथील कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्याकरिता ब्रह्मपुरी येथे शासकीय रुग्णालय येथे हलवण्यात आले. उद्या त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम मौजा पिंपळगाव येथे होईल दुपारी १२ वाजता होणार आहे.


0 टिप्पण्या