Advertisement

महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी आसाराम बगमारेची निवड

महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी आसाराम बगमारेची निवड

ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी आसाराम तिमाजी बगमारे यांची निवड करण्यात आली.

ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही  ग्रामपंचायतीची  १९ आगस्ट ला सकाळी ११३० वाजता ग्रामसभा सरपंच मनोज बन्सोड यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती.

या ग्रामसभेत महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन २०२३-२४ वर्षाचा कृती आराखडा व लेबर बजेट तयार करणे, विवीध शासकीय योजनाबद्धल माहिती देणे,  या विषयावर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली व नंतर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम  समितीचे गठण करणेहा विषय ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला.

यामध्ये गावातील सर्व उपस्थित नागरिकांनी ग्रामसभेत चर्चा करून गावातील प्रतिष्ठित आसाराम तिमाजी बगमारे यांचे नावं ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी सुचविले व महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समीती अध्यक्ष म्हणून आसाराम तिमाजी बगमारे याची निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामसेवक तलांडे, भास्कर गोटेफोडे, ओमदेव ठाकरे , वसंता बगमारे, सुनिता मेश्राम, संगीता ठाकरे, माधुरी ढोंगे, संदेशा गुरूनुले, श्री.गुलाब ठाकरे, गुलाब  राऊत, बाळकृष्ण शेंडे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या