Advertisement

पारशिवनी तालुक्यात पुन्हा पावसाने लावलेली हजेरी , नवेगांव खैरी पेंच धरणाचे सर्व १६ गेट उघडले

पारशिवनी तालुक्यात पुन्हा पावसाने लावलेली हजेरी , नवेगांव खैरी पेंच धरणाचे सर्व १६ गेट उघडले

कन्हान नदी च्या पाणी पात्रात वाढ , नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – मध्यप्रदेश , महाराष्ट्र सह , संपुर्ण नागपुर जिल्ह्यात आणि पारशिवनी तालुक्यात दोन ते तीन दिवसा पासुन सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे पेंच धरणात एकुण ९९% पाण्याचा जलसाठा वाढल्याने धरणाचे दरवाजे दोन दिवसा पासुन उघडल्याने कन्हान नदी पात्रात वाढ झाली असुन नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

कन्हान नदी

मागील जुलै महिन्यात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे पेंच धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने धरणाचे एकुण सोळा दरवाजे उघडण्यात आल्याने गावात व शेतात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यानंतर पावसाने काही दिवस विश्राम घेत पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने पेंच धरणात पाण्याचा जलसाठ्यात वाढ झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे . रविवार ला रात्री पारशिवनी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेंच धरणात सोमवार सकाळी एकुण 99% पाणी झाल्याने धरणाचे सकाळी दहा दरवाजे उघडण्यात आले असुन रात्री पुन्हा सहा दरवाजे उघडण्यात आले होते . पेंच धरणात पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने काल मंगळवार दिनांक 9 आॅगस्ट ला पेंच धरणाचे सकाळी दहा गेट व रात्री सहा गेट उघडण्यात आले आहे . सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे पेंच धरणाचे दरवाजे उघडत असल्याने कन्हान नदी तुडुंब भरुन वाहत असल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या