आमडी-हिवरी गावात आजादी का अमृत महोत्सव निमित्य तिरंगा अभियान जनजागरण व रोड चे लोकार्पण आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न
स्वातंत्रतेचा अमृत महत्सवा निमित्ता हर घर तिरंगा अभीयान भारत सरकार चा वतीने देश भरात चालवीण्यात येत आहे. या अभीयानाचा प्रचार प्रसारा करीता आमदार आशिष जयस्वाल आमडी ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ८-ऑगस्ट-२०२२ सोमवार ला वेळ ११ वाजता भेट दिली. तसेच पारशिवनी पंचायत समिती गट विकास अधीकारी जाधव साहेब. आमडी हिवरी गावातील सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर ग्रामपंचायत सदस्य श्री नरेन्द्र चव्हान, सौ संगीता झाडे,सचीव सुक्ष्मा मोरे मॅडम गावातील मान्यवर नागरीक गंगाधर जी झाङे,लखन जी गुप्ता सुनील भरद्वाज,मोरेश्र्वर बरबटे,धिरेन्द्र ऊईके, आमडी (हिवरी) गावतील मान्यवर नागरीक मोठ्या संख्येने उपस्तीथ होते.

तसेच आमडी (हिवरी) गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असेलेले जिल्हा परीषद शाळे चे मुख्यध्यापक ललीता बावनगडे मॅडम तसेच शिक्षक गन,आरोग्य अधीकारी डॉ.तीवारी साहेब आरोग्य कर्मचारी, कुश्री अधीकारी राठोळ मॅडम,आशा वर्कर,अंगनवाडी शिक्षीका, महीला बचत गटाचे अध्यक्ष व सचीव तसेच सर्व कर्मचारी जनजागृतीचा कार्यक्रमाला व विशेष सभेला उपस्तीथ होते.
तसेच मा.आमदार श्री आशिष जी जयस्वाल साहेब यांनी आमडी (हिवरी) ग्रामपंचायत अंतर्गत आमडी -हिवरी गावातील अंतर्गत सिमेंन्ट रोड बांधकाम करीता पन्नास लक्ष (५०,००,०००) रू.सिमेंन्ट कॉक्रेट(RCC) रोड चे बाधकामा करीता खनिज विकास निधी मधुन मंजुर केले होते. या मंजुर सिमेंन्ट कॉक्रेट रोड चे बाधकाम पुर्ण झाले असुन सिमेंन्ट रोड चा लोकार्पण सोहळा दिनांक 0८ ऑगस्ट २०२२ सोमवार ला वेळ ११:00 वाजता मा.आमदार श्री आशिष जी जयस्वाल साहेब यांचा हस्ते करण्यात आला.
लोकार्पण स्थळी प्रामुख्यानी उपस्थित मान्यवर नारायण जी झाडे (हिवरी) यांचा घरा समोर, केशवराव खळसे यांचा घरा समोर (आमडी) येथी घेण्यात आला. आमडी हिवरी गावातील मान्यवर नागरीक मोठ्या संख्येने सिमेंन्ट रोड चा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रमाला उपस्तीत होते. सरपंच गट ग्रामपंचायत आमडी( हिवरी) सौ शुभांगी राजु भोस्कर, ह्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानून, 75 व्या आजादिका अमृत महोत्सव निमित्य समस्त ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या