भारतीय लहुजी सेनेची मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न
मुखेड- ( तालुका प्रतिनिधी ) मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात दि.१०/0८/२०२२ रोजी भारतीय लहुजी सेनेची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रामुख्याने भारतीय लहुजी सेनेचे सरसेनापती व्हि.जी. रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण ऑगस्ट महिन्यात अनुसुचीत जाती मधील एकुन ५९ जातीचे जातनिहाय लोकसंख्येचा प्रमाणात आरक्षणाचे अ,ब,क,ड अशी वर्गवारी करण्यात यावं यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी म्हणून संबध महाराष्ट्रभर संघटनेतर्फे फार मोठ आंदोलन उभं करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक दिवसीय अंदोलन करावं असा आदेश दिला आहे.
त्याबाबद आढावा घेण्यात आला व तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालीका निवडणूकी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकत्यांचे मत जाणून घेवून ही निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवण्यासाठी गावनिहाय नियोजन करून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निर्धार करण्यात आला आहे व त्याच बरोबर कांही नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
यात प्रामुख्याने नांदेड जिल्हा संघटकपदी मारोती गुंडप्पा घाटे यांची नियुक्ती, मुखेड तालुका अध्यक्ष तरुण तडफदार डॅशींग जेजेराव दत्ता इंगळे चांडोळकर यांची निवड ,नवतरुण पत्रकार पवित्रे प्रशांत रमेश यांची मुखेड तालुका सोशल मिडीया प्रमुख पदी, देविदास माधव गवलवाड यांची निवड मुखेड तालुका सहसंघटक पदी निवड , कमळीकर बालाजी सखाराम यांची निवड मुखेड तालुका उपकार्य अध्यक्ष पदी निवड, राजेश कांबळे कबनुरकर यांची निवड मुखेड तालुका सहकोषाध्यक्ष पदी निवड , आकाश नरासिंग गायकवाड होनवडजकर यांची निवड मुखेड तालुका सहसचिव पदी निवड , सचिन आर्जून बोयनर यांची निवड चांडोळा सर्कल प्रमुख पदी निवड , बाबु दिगांबर इंगळे यांची चांडोळा सर्कल उपाध्यक्षपदी निवड , दिलीप मोतीराम इंगळे यांची चांडोळा सर्कल सचिव पदी निवड , अमोल साहेबराव बोयनर यांची निवड चांडोळा सर्कल प्रसिद्धी प्रमुख पदी वरील सर्वांची निवड करण्यात आली आहे .
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीत बारहाळीकर यांनी सर्व कार्यकत्यांना सविस्तर मार्गदर्शन केले , त्याचबरोबर कायदेविषयक सल्लागार महाराष्ट्र राज्य अॅड. दुधकवडे लक्ष्मीकांत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी संघटनेतील नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख के. एम . दहिकांबळे , जिल्हा संघटक मारोती घाटे , यांनी आपले विचार मांडले. बैठकीचे अध्यक्ष म्हणून केशव गायकवाड मुखेड शहराध्यक्ष होते. या बैठकीत बहुसंख्य प्रमाणात मंडलापुर , जाहुर, चांडोळा , होनवडज , कुंद्राळ , मुखेड शहरातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विविध सामाजीक विषयावर चर्चा झाली अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सुत्रसंचलन व आभार अॅड. लक्ष्मीकांत दुधकवडे यांनी केले आहे.
प्रतिनिधी:- प्रशांत पवित्रे, मुखेड-नांदेड
0 टिप्पण्या