ब्रेकिंग न्युज.! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
दुसऱ्या दिवशी चौथी घटना
ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये मधील अड्याळ हे ब्रह्मपुरी वरून ८ किलोमीटर अंतरावर आहे. येथील शेत शिवारात मेंढा या गावचा रहिवासी विलास विठोबा रंधये यांची शेती ही अड्याळ या गावी असल्याने ते आपल्या शेतीमध्ये निंदा सुरू असताना गेले होते तरी, ते निंदा बरोबर होत आहे की नाही या देखरेखीकरिता जंगलालगतच्या उंच बांधीवरून उभे होऊन देखरेख करत असताना वाघाने मागून झडप घेऊन त्यांना जागीच ठार केले. विलास विठोबा रंधये यांची वय 48 वर्षे होती. घटना बारा वाजताच्या सुमारास घडली असल्याचे समजते.
या आधी दिनाक १६ ऑगस्ट ला दूधवाही येथील एका व्यक्तीला वाघाने बळी घेतला .ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यात नवीन नसून तालुक्यामध्ये वाघाची दहशत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे.प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून नाहक जाणारा लोकांचा बडी थांबवावे अन्यथा लोकांच्या अक्रोषाचा सामना एक दिवस प्रशासनास करावे लागेल हे नाकारता येणार नाही.
ब्रम्हपुरी तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करा-आम आदमी पक्षाचा प्रशासनास इशारा



0 टिप्पण्या