बोलीभाषा वेगळी धर्म तुझा आगला, ओबड- धोबड जमीन कसत… मैलो मेल चालला
सर्वाआधी जन्मला तरी मागे कसा राहिला
आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की डोंगरदऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, जगाशी कुठलाही संपर्क नसलेला समाज होय.
आदिवासी हा शब्द आदी + वासी अशा दोन शब्दांनी बनलेला असून प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे आहेत. जगाच्या पाठीवर ज्या माणसांने, ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी होय आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्या रानमेव्यावर करीत आहे. गडचिरोली, चंद्रपुर, नंदुरबार, पालघर, मेळघाट, धारणी अमरावती ठापणे, किनवट या भागात राहणारे आदिवासी जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तुला ते दैवत मानतात.
एकलव्याच्या काळापासून आदिवासी समाज अन्याय सहन करत आला आहे रावणाचे वंशज आजही आदिवासी म्हणूनच श्रीलंकेत ओळखले जातात . त्यांना श्रीलंका शासना कडून तशी वंशज म्हणून रक्कम अदा केली जाते. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करून हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींना जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे आदिवासी विद्यार्थ्यां च्या शिक्षणासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या .
तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करत यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरू झाले आहे .
या वर्षी जागतिक आदिवासी दिनाची थीम “संरक्षणात स्थानिक महिलांची भूमिका आणि पारंपारिक ज्ञानाचे प्रसारण” ही 2022 ची ( Role of local women in conservation and transmission of traditional knowledge ) थीम आहे.
गडचिरोली चक्रधर मेश्राम दि. ९ आगष्ट २०२२-
0 टिप्पण्या