Advertisement

नदी पात्रालगत उपसा करून बाहेर काढून ठेवलेल्या वाळूची नोंद तहसीलदार यांनी साठा वहीत केली आहे का? प्रहार संघटनेची तहसीलदारांना विचारणा

नदी पात्रालगत उपसा करून बाहेर काढून ठेवलेल्या वाळूची नोंद तहसीलदार यांनी साठा वहीत केली आहे का ?

प्रहार संघटनेची तहसीलदारांना विचारणा

नदीकाठालगत ज्याठिकाणी रेती साठा आहे त्याठिकाणी कंत्राटदारांनी दर्शनी ठिकाणी जाहीर फलकांवर रेतीसाठ्याची माहिती देणे गरजेचे असतांना तसेच सदर जागा अकृषक असणे आवश्यक असताना नियमबाह्य पध्दतीने अवैध रेतीसाठा जमा केल्याचे सर्वत्र दिसून येत आहे . ही अवैध रेती हायवा ट्रकच्या माध्यमातून भरधाव वेगाने वाहतूक करून परीसरातील चिखलधोकडा, अऱ्हेरनवरगाव ,पिंपळगाव, नांदगाव आणि कुर्झा रस्ताचे नुकसान केले आहे परिणामी याचा फटका सर्वसामान्य लोकांना होत आहे . तरी तात्काळ अवैध रेती वाहतूक थांबवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा . तसेच रेती साठ्याची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी.

अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्ता रोको आंदोलन करेल याची दक्षता घ्यावी.
अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन दिले.सदर निवेदनदेते वेळी ॲड.हेमंत उरकुडे,
ॲड.सुधीर तलमले,लतेश रामटेके,
ॲड.बोरकर,होमराज राऊत,हरीचंद्र ठेंगरे, डाकराम ठेंगरे,प्रशांत दाणी,दिनेश गाताळे, संजय सहारे, रामलाल तुपट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई द्या – प्रहार संघटना

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील व नदीकाठी असलेल्या गावांमध्ये आलेल्या पुरामुळे धानपिक वाहून गेले तर कित्येक धानाचे पीक सडून खराब झाले, पेरणे वाया गेले, घरांची व जनावरांच्या गोठ्याची पडझड झाली त्याचप्रमाणे जंगल परीसरातील वाघांच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी जमिनी पडीत ठेवल्या अश्या शेतकऱ्यांना शासनाने त्वरित रुपये ५००००/- (रु.पन्नास हजार) हेक्टरी मदर द्यावी. तसेच धानपिकाची घराची पडझड झाल्या बाबतचे त्वरित पंचनाने करून आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन दिले. सदर निवेदन देतेवेळी ॲड.हेमंत उरकुडे,
ॲड.सुधीर तलमले, लतेश रामटेके, ॲड.बोरकर, होमराज राऊत, हरीचंद्र ठेंगरे, डाकराम ठेंगरे, प्रशांत दाणी, दिनेश गाताळे, संजय सहारे, रामलाल तुपट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या