हाता मधुन मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन नेणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध पोस्टे ला गुन्हा दाखल
पोलीस स्टेशन कन्हान ला गुन्हा दाखल ,आरोपीचा शोध सुरु
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा हायवे रोड वरील डुमरी पेट्रोल पंप समोर फिर्यादी यांच्या मुलगा चालत्या गाडीवर मोबाइल हातामध्ये घेवुन पाहत असतांना कोणीतरी दोन अज्ञात आरोपींनी मागुन वेगाने येऊन जबरदस्ती ने मोबाइल हिसकवुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला दोन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक १२ आॅगस्ट ला सायंकाळी ५:०० ते ५:३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी नामे बेनीराम शामराव वरणकर , वय ४४ वर्ष , रा . वंसतराव जानबा ढोपडे दुर्गा नगर , प्लॉट नं . २ ९९ , हनुमान मंदीर जवळ एचपी पेट्रोल पंपच्या मागे हिंगणा रोड , नागपुर हे आपल्या (त्यांचा) मुलगा नामे कलश याचे सह दुचाकी वाहन क्रमांक एमएच- ४० / सीजे- ०२५१ ने श्रीकृष्ण चक्रधरस्वामी महानुभाव मंदीर मनसर वरुन आपल्या घरी नागपुर ला जात असता डुमरी पेट्रोल पंप समोर हायवे रोडवर कन्हान जवळ बेनीराम वरणकर यांचा मुलगा कलश हा चालत्या गाडीवर मोबाईल आपल्या हातामध्ये घेवुन पाहत होता . त्यादरम्यान अचानक एका दुचाकी वाहनावर दोन अज्ञात आरोपी वय अंदाजे २५ ते ३० वयाचे बेनीराम वरणकर यांचा दुचाकी वाहना जवळ मनसर कडुन कन्हान कडे जाणारे मार्गावरून मागुन वेगाने आले आणि बेनीराम वरणकर यांच्या मुलाच्या हातामधील विवो कंपनीचा मोबाईल फोन किंमत अंदाजे १४,००० / – रु . चा मोबाइल जबरदस्तीने हिसकावुन कन्हान कडे वेगाने पळुन गेले .
बेनीराम वरणकर दुचाकी वाहनाने त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला पण ते मिळाले नाही .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी बेनीराम वरणकर यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे ला आरोपी विरुध्द कलम ३९२ , ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि सतिश मेश्राम हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या