चौगान येथे घराची पडझड
ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी शहरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या चौगान येथील गिरीधर भुते व दिगांबर भुते यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. सध्या त्यांनी गावातील मंदिरात आपला संसार थाटलाय.
वेळीच पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संकटात सापडलेल्या भुते परिवार तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य पंकज तिडके यांनी केली आहे.
त्याचबरोबर तालुक्यात बऱ्याच गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेकांचे धान पीक धोक्यात आले आहे.



0 टिप्पण्या