कन्हान सत्रापुर येथील जुगार अड्डयावर धाड
स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची कारवाई
कारवाई दरम्यान २२ जुगारी इसमांना ताब्यात घेऊन नगदी रुपए तासपत्ते , १७ मोबाईल , एक चार चाकी व एक दुचाकी वाहन व जुगाराचे इतर साहित्य सह एकुण २०,०१,२४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर शिवारात स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीसांनी जुगार अड्डयावर धाड मारुन २२ जुगारी इसमांना ताब्यात घेऊन नगदी रुपए , १७ मोबाईल , एक चार चाकी व एक दुचाकी वाहन व जुगाराचे इतर साहित्य सह एकुण २०,०१,२४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक २४ आॅगस्ट ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि परिसरातील सत्रापुर रेल्वे फाटक जवळ एका घरात काही इसम हे तासपत्त्यावर पैशांची बाजी लावून जुगाराचा पैशाचा हारजीतचा खेळ खेळत आहे . अश्या विश्वसनीय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी बुधवार दिनांक २४ आॅगस्ट ला सकाळी १०.२३ वाजता च्या दरम्यान मौजा सत्रापुर येथे एका घरात सापळा रचुन जुगार अड्डयावर धाड मारली असता एकुण २४ जुगारी इसम नामे
१ ) अंकित गजानन पाटे रा .पार्वती नगर नागपुर , २ ) सौरभ ओमप्रकाश गौर रा . संत्रा मार्केट नागपुर ३ ) राजेश रामचंद्र नंदनवार रा . गोळीबार चौक नागपुर ४ ) सलमान हारून खान रा मिनीमाता नगर कळमना नागपुर ५ ) संतोश विनायक वेलतुरकर रा टेलीफोन एक्सचेंज चौक नागपुर , ६ ) स्वप्नील मनोज समर्थ रा केडी के कॉलेज जवळ नागपुर ७ ) भावेश नानक खंडवानी रा मेओ हॉस्पीतल नागपुर ८ ) संतोश बंसीलाल निभरे रा लालगंज खैरीपुरा नागपुर ९ ) साखीर गफर शेख रा मोमीनपुरा नागपुर १० ) आशिश शंकर रामटेके रा शिवाजी नगर नागपुर ११ ) राजीद गफर शेख रा गिट्टी खदान नागपुर १२ ) सम्मी खान बहादुर खान रा कुभारपुरा नागपुर १३ ) आकाश दशरथ खापेकर रा जुनीमंगलवारी नागपुर १४ ) आकाश जयचंद गुप्ता रा शांतीनगर नागपुर १५ ) ईवान अन्ना राउत पोलीस लाईन नागपुर १६ ) अनिकेत विरेंद्र खडसे रा सत्रापुर कन्हान १७ ) दुर्गेश अनिल वैद्य रा दिघोरी नागपुर १८ ) जितेंद्र परसराम टकरानी रा जरीपटका नागपुर १ ९ ) किरणा विरू खडसे रा कन्हान २० ) अशोक रामचंद्र सिसकर रा पाचपावली नागपुर २१ ) शेख वसीम शेख अखील रा पारडी नागपुर २२ ) सुरज रघुवीर मेश्राम रा जुनी खल्लाशी लाईन नागपुर २३ ) कन्हान – पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक डेनियल शेन्डे रा सत्रापुर कन्हान २४ ) संदीप बुरेले रा महादुला कोराडी नागपुर हे खेळतांना दिसले असुन २२ जुगारी इसमांना ताब्यात घेण्यात आले व २ फरार असे एकूण २४ इसमांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असुन जुगारी इसमांनी सदर चा जुगार हा डेनियल शेंडे रा.सत्रापुर व संदीप गुरीले, रा.कोराडी हे भरवित असल्याचे सांगितले असून ते दोघे ही फरार आहेत .
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी २२ जुगारींना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन नगदी २,४६ , ७२० रू तासपत्ते , १७ मोबाईल संच कि ३,०४,००० रू , एक चार चाकी व एक दुचाकी वाहन की १४,५०,००० रू , व जुगाराचे इतर साहित्य असा एकुण २०,०१,२४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन कन्हान येथे अपराध.क्रमांक . ४९५२२ कलम ४ , ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम सहकलम १०९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता कन्हान पोलीसांना स्वाधिन करण्यात आले आहे. सदर कार्यवाही नागपुर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर , अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , सफौ चंद्रशेखर घडेकर , पोहवा विनोद काळे , पोना मयूर ढेकळे , अमृत किनगे , रोहन डाखोरे , प्रणय बनाफर , अमोल वाघ , महेश बिसने , चापोशी आशुतोष लांजेवार , सुमित बांगडे सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या