ब्रह्मपुरी पोलीस विभागाची तिरंगा बाईक रॅली संपन्न
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न
केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण होत असल्याने हर घर तिरंगा या उपक्रमाला प्रतिसाद देत ब्रह्मपुरी पोलीस विभागाने पोलीस स्टेशन ते टिळक नगर, ख्रिस्तानंद कॉन्व्हेंट, ख्रिस्तानंद चौक, शिवाजी चौक, ते परत पोलीस स्टेशन येथे तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. तिरंगा बाईक रॅलीमध्ये भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या.
तद्नंतर पंचायत समिती ब्रह्मपुरी येथील सभागृहामध्ये महसूल विभाग व पोलीस विभाग यांचे द्वारे रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी समाजातील सर्व गरजू लोकांना रक्तदान करण्याकरिता नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन महसूल विभाग व पोलीस विभागाकडून करण्यात आले.


0 टिप्पण्या