Advertisement

वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा

वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा

न्यू लाईफ संस्था, ब्रम्हपुरीचा पर्यावरणीय उपक्रम

वृक्ष हा आपल्या पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या सभोवताली असलेली झाडे, आपल्याला फक्त सावली देत नाहीत, तर वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात, आणि जीवनावश्यक असा ऑक्सिजन  मोफत आपल्याला देत असतात. म्हणूनच भविष्यात आपल्या परिसरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळावा, ह्यासाठी ब्रम्हपुरी सामाजिक कार्य करणारी प्रसिद्ध न्यू लाईफ बहूउद्देशीय संस्थेमार्फत, संस्थेचे सचिव श्री. उदयकुमार पगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्झा वार्डातील राधाकृष्ण नगरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये कडूनिंब, आंबा, तगद, वड, कनेरी अश्या विविध 10 प्रजातीच्या झाडांचे रोप लावण्यात आले.

यावेळीस, न्यू लाईफ बहूउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कु.पुनम कुथे, उपाध्यक्ष अरविंद नागोसे, कोषाध्यक्ष भूषण आंबोरकर, तेजस गायधने, राजू मूळे, जतीन निकोडे, प्रिया नागोसे, अंकिता गायधने, श्रुती मेश्राम, आर्यन नागोसे, यश मूळे, योगेश नंदनवार तसेच चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा आणि किक बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक सिहान गणेश लांजेवार, सचिन भानारकर, प्रीतम राऊत ,मोहिनी भुते, वैष्णवी ठेंगरी, अक्षय कुळे, किरण भुते, श्रुती बोकडे, श्रावणी पोपटे, प्रिन्स सोनटक्के, पारस समर्थ हे उपस्तिथ होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या