Advertisement

मेंढा किरमींटी येथे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खुन! आरोपीची तुरुगांत रवानगी

मेंढा किरमींटी  येथे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खुन! आरोपीची तुरुगांत रवानगी

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेंढा  किरमिटी येथील रोशन शंकर खामदेवे वय 26 याने आईला मारहाण केली म्हणून मोठ्या भावाला काठीने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 ऑगस्ट ला घडली.

रोशन खामादेवे ह्याला मोठ्या भावाने बाजारात जाण्याकरिता सांगितले होते मात्र आईला मारल्याचा राग मनात धरून काठीने मोठ्या भावाचे डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे भरती केले असता  ८ ऑगस्ट ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मृत्यू झाल्याने आरोपी रोशन शंकर खामदेवें यास अप क्र 2612022 कलम 326 भा ,द ,वि, अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन नागभिडचे पोलीस निरिक्षक राजू मेंढे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बारसागडे पुढील तपास करीत असून आरोपीस अटक केली आहे. वैद्यकीय तपासणी करून आल्यानंतर  , आरोपीला न्यायालयात हजर करुण न्यायालयाने आरोपीस  तुरुगांत रवानगी केली,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या