लाडज गावाच्या पुनर्वसनावर नायब तहसिलदार यांच्याशी चर्चा
दिनांक 9,10, आणि 11 अगस्त 2022 ला गोसखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदिच्या काठावर असलेल्या ब्रम्हापुरी तालुक्यातिल लाडज या गावात पुराचे पानी शिरुन येथील पीकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पुराच्या पाण्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची समस्या निर्माण झाली होती त्या अनुषंगाने 12 ऑगस्टला तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथून आरोग्य पथक व अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन येेथील नागरिकांचे आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला व येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्याचप्रमाने नायब तहसिलदार यांच्याशी गावाचा पुनर्वसन या विषयावर गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली यावेळी बहुसंख्येने ग्रामवासी उपस्थित होते.


0 टिप्पण्या