अवैध जनावरांचे वाहतुक करणाऱ्या वाहनाला कन्हान पोलीसांनी पकडले
कारवाई दरम्यान दोन आरोपी अटक,गाय-गोरे व वाहनासह एकुण ५६,६००० रुपयाचा मुद्देमाल जप्त
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर रेल्वे गेट जवळ पोलीसांनी नाकाबंदी करुन अवैध जनावरांच्या वाहनाला पकडुन दोन आरोपी ला ताब्यात घेऊन एकुण ५६,६००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक २३ आॅगस्ट ला रात्री ९:३० ते १०:०० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नापोशि राजेंद्र गौतम हे आपल्या स्टाॅप सह परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि एक टाटा कंपनीची योद्धा वाहन क्रमांक एम एच ४० बीजी ३२६१ मध्ये अवैध जानावरांचे वाहतुक होत आहे .
अश्या विश्वसनीय माहिती नुसार कन्हान पोलीसांनी स्टाॅप सह सत्रापुर रेल्वे फाटका जवळ नाकाबंदी करुन उभे असतांना समोरुन एक वाहन येत असतांनी दिसल्याने पोलीसांनी हात देवुन थांबविले असता वाहन चालकाला व एम एच ४० बीझी ३२६१ वाहनाला ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली असता वाहना मधील मागील डाल्यात अवैध जनावरे बांधली दिसली पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन पाहणी केली असता लाल रंगाची १ , पांढऱ्या रंगाची १ , असे दोन गाई किंमत १०,००० रुपए , लाल रंगाचे ४ गोरे आणि पांढऱ्या रंगाचे ३ गोरे किंमत किंमत ५६,००० रुपए असा एकुण ६६,००० रुपयाचा मुद्देमाल व टाटा कंपनीची योद्धा वाहन क्रमांक एम एच ४० बीझी ३२६१ किंमत ५,००,००० रुपए असा एकुण ५६,६००० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला असुन वाहन व गाई गोरे जप्त करुन पोलीसांनी ताब्यात घेतले . सदर गाई गोरे चाऱ्यापाण्याची व्यवस्था करण्याकरिता कन्हान पोलीसांनी सुक्रुत गौशाला कल्याणकारी संस्था खैरी पिंपळगाव तह लाखनी जि भंडारा या गौ शाळेत जमा केले . सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी राजेंद्र गौतक यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी वाहन चालक नामे १) जावेद खान आभीस खान वय ३१ वर्ष राहणार पुराना भोईपुरा कामठी , क्लिनर नामे २) आफताब समिम खान वय १९ वर्ष राहणार भाजीमंडी कामठी यांचा विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ (१) , ११ (१)(अ) , ११(१)(ड) , ११(१)(ई) , ११(१)(एफ) , ११(१)(आई) , महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ , कलम ५अ , ५ब , महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड काॅस्टेबल अरुण कुमार सहारे , प्रशांत रंगारी , राजेंद्र गौतम हे करीत आहे .


0 टिप्पण्या