आशा व गट प्रवर्तकांचे शोषण केंद्र सरकारने थांबवावे.
आयटकचा तीव्र लढा उभारण्याचा इशारा
चंद्रपूर ;–आयटक च्या नेतृत्वात आजपर्यंत आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिल्ली,मुंबई,नागपूर व जिल्हा पातळीवर अनेक आंदोलन केली परंतु त्यांच्या मानधनात तुटपुंजी वाढ करून सरकार त्यांची थट्टा करत आहे. केंद्र सरकारने आशा फक्त 3 तास काम करतात, असे योजनेत नमूद केले आहे. मात्र आशा 24 तास काम करत आहेत. कोणतेही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यावर रात्री , पहाटे उठून घराचा विचार न करता आरोग्याचे काम करत आहेत. कोरोना काळात जनतेने आशा व गट प्रवर्तकांचे काम पाहिले असुन त्यांचे कौतुक केले आहे. मात्र केंद्र सरकार फक्त शाब्दिक कौतुक करत आहे.
आशा व गट प्रवर्तकानि कोरोना काळात स्वतःचा जीव ही गमावला आहे. वेळप्रसंगी कुटुंबाचा विरोध पत्करून काम केले आहे. मात्र आशाना 2018 पासून 1 रुपयाचीही मानधनात वाढ केली नाही. तर गट प्रवर्तक उच्च शिक्षित असून फक्त प्रवास भत्ता देऊन फुकट काम करून घेत आहेत. आशा व गट प्रवर्तकांचे केंद्र सरकार आर्थिक शोषण करत आहे. आयटक संघटना या विरोधात पुढील काळात केंद्र सरकारचे खासदार, मंत्री, भाजपला जबाब विचार आंदोलन करणार आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात आशा व गट प्रवर्तक आपले पती, सासूबाईना सोबत घेऊन नागपूर विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असून देशव्यापी आंदोलन दिल्लीत करण्याचा इशारा दिला आहे.
प्रचंड वाढलेल्या महागाईत कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागाची संपुर्ण धुरा आशाच्या खांद्यावर सोपविली आहे मात्र त्यांना योग्य मानधन . नाहि व मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली होती त्या कामामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी अगदी तुटपुंज्या मानधनात महत्वाची भूमिका बजावली होती एवढेच नाही तर आरोग्य विभागाचे 78 प्रकारचे कामे त्यांच्या कडून राबवून घेतले जातात परंतु त्या बदल्यात मिळणारे अत्यल्प मानधन सुद्धा चार चार महिने मिळत नाही ही अत्यंत संताप जनक बाब आहे. काही कामे तर विना मोबदला त्यांच्या कडून बळजबरीने करवून घेतले जातात.
केंद्र सरकारने 2018 पासून आशा व गट प्रर्वतकांना मानधनात वाढ केलेली नाही . मात्र जगण्याचे सर्व साधनात प्रचंड वाढ झालेली आहे. घरगुती गॅस दरवाढ झाली आहे. मात्र मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. या मुळे केंद्र सरकार ने त्वरित मानधन वाढ करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य अध्यक्ष राजू देसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आयटक यांनी चंद्रपूर जिल्हा अधिवेशनात दिला . गट प्रर्वतकांना राज्य सरकारने आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी प्रमाणे सामावून घेतले पाहिजे. अन्यथा गट प्रर्वतकांना संघटित करून लढा देण्याचा इशारा 5 आगस्ट रोजी विदर्भ विभाग गट प्रवर्तक मेळावा 11 वा परवाना भवन नागपूर येथे आयोजित करण्यात आला असून तो यशस्वी करावा असे आवाहनही केले.

राज्यभर 10 ते 30 आगस्ट 22 ला राज्यभर आशा व गट प्रवर्तक आंदोलन करणार आहेत ते यशस्वी करावेत असेही आवाहन केले.
आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा या शिवाय अन्य मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व संघटना बळकट करण्यासाठी येत्या 31 जुलै 22 रोजी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अधिवेशन नागचारी महाराज सभागृह चंद्रपूर सकाळी 12 वाजता आयोजित केला होता.
सदर आंदोलनाचे उदघाटक कॉ राजू देसले राज्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना नासिक, कॉ प्रा नामदेव कन्नके, जिल्हा सचिव,भारतीय कम्युनिस्ट पक्ष , मा मंगला पांडे राष्ट्रीय अध्यक्षा आशा व गट प्रवर्तक फेडरेशन , आयटक, राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे, किसान सभा नेते कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ.
रवींद्र उमाटे राज्य उपाध्यक्ष आशा ,गट प्रवर्तक, अधिवेशनाच्या अध्यक्षा गट प्रवर्तक फर्जना शेख होत्या . गजानन घोडे, मीनाक्षी पटाईत,विचारमंचवर आदी पदाधिकारी उपस्थित होते. कॉ. श्याम काळे राज्य सरचिटणीस आयटक यांनी आयटकचा 102 वर्षाचा इतिहास सांगितला . केंद्र सरकार कामगार , कर्मचारी विरोधी धोरण राबवित आहे. योजना कर्मचारी चे शोषण करत आहे. या विरोधात संघटित होऊन किमान वेतन मिळविण्यासाठी संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
या होणाऱ्या अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होत्या. कॉ. पांडे यांनी आशा व गट प्रवर्तक लढा आता किमान वेतन साठी तीव्र करण्याचा इशारा दिला. पुढील तीन वर्षे साठी पदाधिकारी निवड करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी विनोद झोडगे, सचिव निकिता निर, कार्याध्यक्ष पदी फर्जना शेख, कल्पना मिलमिले उपाध्यक्ष पदीरवींद्र उमाटे कोषाध्यक्ष मीना चौधरी, संघटन सचिव ममता भीमटे, सुनंदा मूलमुळे, किमान वेतन लागू करणयात यावे ,थकीत मानधन त्वरित द्या यासह अन्य मागण्यासाठी येत्या 29 आगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद कार्यालय वर ताट, वाटी, लाटणे घेऊन विशाल संताप मोर्चा काढण्याचा इशारा कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे.
कार्यक्रम ची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते प्राचार्य शिवदास उटाणे यांना आदरांजली वाहण्यात आली.
सूत्रसंचालन रवींद्र उमाटे, आभार कल्पना मिलमिले यांनी मानले.


0 टिप्पण्या