Advertisement

टेकाडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा

टेकाडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – परिसरातील टेकाडी गावातील हनुमान मंदिर परिसरात  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात आला . भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त आणि तिरंग्याचा सन्मानार्थ करा सन्मान तिरंग्याचा कार्यक्रम आणि प्रत्येक घरोघरी तिरंगा या मोहिम अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व प्रथम भारत मातेचे पूजन आणि मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या मध्ये ग्राम पंचायत साफ़ सफ़ाई कर्मचारी आणि डाॅक्टरांचा पुष्प गुच्छ आणि झेंडा देउन स्वागत सम्मान करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

या प्रसंगी वसंता केकतपुरे , नत्थू मोहाडे , नंदु लेकुरवाडे , मनोज लेकुरवाडे , पेढंरिजि बालबुधे , प्रभाकर बोराडे , रमेश बालपांडे , मनोज बोराडे , मनिष कुरडकर , मयुर सेलोकर , अंकित लक्षने , कुनाल लक्षने , लोकेश चिंचुलकर सह आदि नागरिक उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या