टेकाडी येथे दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त त्यांच्या मतदार संघ टेकाडी येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मी बर्वे यांच्या वतीने दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवार ला करण्यात आले होते . शिबीरा चा पहिल्या दिवशी रक्तदाब , रक्तातील साखर , कर्करोग , तोंडाचे आजार , ईसीजी , डोळे व रक्ताची तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले असुन कोविड लसीकरण १८ वर्षां वरील लोकांसाठी करण्यात आले . तसेच शिबीराचा दुसऱ्या दिवशी शनिवार ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून महिलां मध्ये स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करुन दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी डीएचओ डॉ.दीपक सायलोकर , डॉ.प्रशांत वाघ , ग्रामविकास अधिकारी आतिश देशभ्रतार , वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली हिंगे , पी.एस.सदस्या करुणा भोवते , टेकाडी ग्रामपंचायत उपसरपंच मीनाक्षी बुधे , वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती राऊत , कांद्री ग्रामपंचायत उपसरपंच श्यामकुमार (बबलू) बर्वे , रोग कल्याण समिती सदस्य सतीश घारड सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनोज लेकुरवाले यांनी केले तर आभार मनोज मोहडे यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सदस्य आशा राऊत , संध्या सिंग , मंजू जांबे , अरुण सूर्यवंशी , दिनेश चिमोटे , आरोग्य कर्मचारी , आशा सेवक , ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी सह आदि ने सहकार्य केले .


0 टिप्पण्या