कन्हान येथे जागतिक आदिवासी दिवस थाटात साजरा
कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे जागतिक आदिवासी दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते आदिवासींचे नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला .
मंगळवार दिनांक 9 आॅगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्य कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते आदिवासींचे नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमात उपस्थित मंच सचिव सुरज वरखडे यांनी जागतिक आदिवासी दिवस व बिरसा मुंडा यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जागतिक आदिवासी दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निबांळकर , अनुराग महल्ले , आकाश पंडीतकर , कृणाल राजपुत सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर



0 टिप्पण्या