दलित विद्यार्थ्यांने पाणी पिल्याने मारहाणीत मृत्यू
जातीयवादी शिक्षकाला अटक करून कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिरिपा आणि रिपाइं च्या वतीने निषेध.
राजस्थान च्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
एका शिक्षकाच्या पाणी पिण्याचा मडक्यातील पाणी दलित विद्यार्थ्यांनी पिले असता तु माझ्या मडक्यातील पाणी का पिले . तु उछूत जातीचा आहेस म्हणून त्याला वर्गातील सर्व विद्यार्थी समोर बेदम मारहाण केली . मारहाणीत त्याचा कान बद्द झाला व तो बेशुध्द पडल्यावर त्याला दवाखाण्यात भरती केले परंतु शेवटी त्या विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला . राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील सरस्वती विद्यालय चा वर्ग तिसरीत शिकणारा विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल शाळेत गेला असता वर्गात त्याला ताहान लागली म्हणून त्याने शिक्षकाचा माटातील पाणी पिले .
पाणी पितांना छैलशिंह या शिक्षकांनी बघितले . तु दलित जातीचा मुलगा आहेस तुला माहीत नाही काय तु माझ्या माटातील पाणी का पिलास म्हणून इंद्रकुमार ह्यला वर्गातच बेदम मारहाण केली . सदर शिक्षकांने त्याच्या काना कानावर मारहान केली . त्यामुळे तो बेशुध्द पडला . वर्गातील सर्व विध्यार्थी सुद्धा घाबरले . शेवटी आता आपलं…काही खर नाही म्हणून सदर शिक्षकांनी त्या विद्यार्थाला परिजत दवाखाण्यात भरती केले . तेथून उदयपूर येथील दवाखाण्यात भरती केले परंतू तेथेही त्याचा ईलाज झाला नाही म्हणून शहरातील अहमदाबाद येथील दवाखाण्यात भरती केले परंतु शेवटी इंद्रकुमार यांचा मृत्यू झाला .
सदर घटनेवर पडदा पाडण्यासाठी त्या शिक्षकांनी इंद्रकुमार च्या आई वडीलांना बोलून सोबत पैशाचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल. इंदकुमार च्या काकानी पोलीस स्टेशन गाठून रिपोर्ट दिली असता छैलाशिह शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला . अजुनही जात – पात गेली नाही. ज्ञार्नाजन करणाऱ्या शिक्षकाकडून असे कृत्य घडणे म्हणजे शरमीची आणि गंभीर बाब आहे .. सदर शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी त्या गावातील अनु. जातीचा लोकांनी उठाव केला आहे . याचे पडसाद महाराष्ट्रात पडताच पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा . जोगेंद्र कवाडे यांनी सदर घटनेचा निषेध केला असून त्या शिक्षकाला शिक्षा व्हावी अशी मागणीही केली आहे. जातीयवाद हा स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाला लागलेला कलंक आहे.जातीवादाच्या अजगराचा स्वातंत्र्याला विळखा पडला असून जातिवाद संपुष्टात आल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही.
राजस्थान च्या जालोर मधील अवघ्या 9 वर्षांच्या कोवळ्या दलित विद्यार्थ्यांची केवळ त्याने सवर्ण शिक्षकांसाठी ठेवलेल्या माठातुन पाणी पिल्याच्या रागातून झालेली निर्घृण हत्या हा मानवतेला लागलेला कलंक आहे.या अमानुष जातीवादाचा तीव्र निषेध करीत असून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही याची प्रचिती अशा जातीयवादी घटनांतून येते. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जातीवादाचे विष देशाला कंठात धरावे लागत आहे. जातीवादाचे विष देश आणि समाजातून नष्ट केले पाहिजे. याचा आज स्वातंत्र्य दिनी देशाने निर्धार केला पाहिजे. असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
राजस्थान मध्ये दिवसेंदिवस दलित समाजावर अत्याचार वाढत आहे. दलितांवरील अत्याचार रोखण्याकडे राजस्थान चे मुख्यमंत्री गेहलोत यांचे सरकार पुरेसे लक्ष देत नाही. दलितांवर वाढते अत्याचार रोखण्याकडे अपयशी ठरलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
चक्रधर मेश्राम
0 टिप्पण्या