Advertisement

शेतीचे पंचनामे तातडीने करा : माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दर्वे यांची मागणी

शेतीचे पंचनामे तातडीने करा : माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा  दर्वे यांची मागणी

सतत येणारा पाऊस व अतिवृष्टी मुळे नदी नाले तुडुंब भरले असताना गेल्या आठवड्याभरात तीन वेळा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला त्यामध्ये हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली व धानपिके, सोयाबीन, तुर कपाशी मका या सोबतच इतर पिके पूर्णतः मागील आठवड्याभरात  दोन – तीनदा आलेल्या सतत पुरामुळे पिके पाण्यात  बुडून असल्याने नष्ट झाली आहेत.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर  ऊपासमारीची वेळ येत आहे त्या सोबतच ज्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरलेले होते अशी घरेही कोसळण्याची भीती आहे त्यांचे सुद्धा प्रशासनाने तातडीने पंचनामे व सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दर्वे यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या