परिसरातील जे एन रोड चक्रधर पेट्रोल पंप समोर अवैधरित्या अग्नीशस्त्र बागळणाऱ्या आरोपीला पकडले
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांची कारवाई ,
आरोपी अटक , लोखंडी माऊझर सह एकुण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील चक्रधर पेट्रोल पंप समोर अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारा आरोपी नामे हसन मांजर खजे मन्सुक यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पकडुन त्याचे अंगझडती घेतली असता देशी बनावटीचा लोखंडी माऊझर मिळुन आल्याने पोलीसांनी एकुण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गुरूवार दिनांक २५ आॅगस्ट ला रात्री ११:०० ते शुक्रवार दिनांक २६ आॅगस्ट ला सकाळी ५:०० वाजता पर्यंत नागपुर ग्रामीण जिल्ह्या मध्ये राबविण्यात येणाऱ्या आॅल आॅफिसर आऊट मोहिम दरम्यान कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमी दाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली कि एक इसम पांढऱ्या हिरव्या रंगाचे चेक्स चे शर्ट घातलेला इसम जे एन रोड चक्रधर पेट्रोल पंप समोर आपले जवळ अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुण आहे व तो काहीतरी गुन्हा करण्याचे तयारीत आहे . अश्या विश्वसनीय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस घटनास्थळी पोहचली असता तेथे एक इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारफुस केली असता त्याने आपले नाव हसन मांजर खजे मन्सुक वय २३ वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक हरीहर नगर कांद्री कन्हान असे सांगितल्याने त्याचे अंगझडती घेतली असता त्याचा कमरेच्या डाव्या साईड ला पॅंन्ट मध्ये खोसुन ठेवलेली एक लोखंडी हॅण्डमेड देशी बनावटीचा माऊझर मिळुन आल्याने पंचासमक्ष अग्नीशस्त्र बाळगण्या बाबत परवाना विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले .
सदर कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आरोपी नामे हसन मांजर खजे मन्सुक यास अटक करुन त्यांचा जवळुन एक देशी बनावटीचा लोखंडी माऊझर किंमत ६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अनिल डी राऊत यांच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध कलम ३,२५ भा ह का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक महादेव सुरजुसे हे पुढील तपास करीत आहे .
सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर , अपर पुलिस अधीक्षक राहुल माखणीकर यांच्या मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , स.पो.नि. अनिल राऊत , पोलीस हवालदार विनोद काळे , नाना राऊत , अरविंद भगत , शैलेश यादव , विरेंद्र नरड , प्रणय बनाफर , आशुतोष लांजेवार सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर



0 टिप्पण्या