हीराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे स्वातंत्र्य दिन साजरा
कन्हान: आज दिनांक 15ऑगस्ट 2022ला श्रीमती हीराबाई उच्च प्राथ शाळा कन्हान येते 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ह्यावर्षी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75वर्ष पूर्ण झाल्या कारणांनी संपूर्ण भारत देशात हा सोहळा हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे शाळेचे संचालक नरेन्द्र वाघमारे प्रामुख्यानी होते. नरेन्द्र वाघमारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास वंदना रामापुरे यानी मुलाना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जयश्री पवार, हेमंत वंजारी, हेमंत चांदेवार, आयशा अंसारी, कीर्ति वैरागड़े, नेहा गायधने, वसतिगृहाचे अधीक्षक गणेश रामपुरे इत्यादी मान्यवर प्रामुख्यानी उपस्तित होते.
प्रस्तावना हेमंत चांदेवार यांनी केली तर आभार प्रदर्शन नेहा गायधने यानी केले.



0 टिप्पण्या