पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसीकरीता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची मुदत आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी केल्यास त्यांच्या खात्यात सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्यानंतर दोन -दोन हजारांचे तीन हप्ते असे एकूण सहा हजार रुपयांची मदत केंद्र शासनातर्फे दिली जाते. त्यासाठी ऑनलाईन केवायसी असणे अनिवार्य आहे. सदर योजना ओटीपी वर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसान वेब पोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.
ऑनलाईन केवायसीकरीता राबविण्यात येणारी प्रक्रिया पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा. आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा.जर या प्रक्रियेत कोणत्याही शेतकऱ्याचा अर्ज रद्द झाला किंवा अडचण आली तर जवळच्या आधारसेवा केंद्राला भेट द्या. तसेच हेल्पलाइन क्रमांक 155261 आणि 0 11 – 24300606 या क्रमांकावर संपर्क करा, असे प्रशासनाने कळविले आहे.
0 टिप्पण्या