मोठ्या नेत्याला ध्यजा रोहनाला आमंत्रित न करता गावातील 12वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थी च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
धसई- 15 ऑगस्ट हा आपल्या देशातील एक ऐतिहासिक दिवस आहे याच दिवशी ऐतिहासिक दिवसाला 75वर्ष पूर्ण झाले आणि आपण भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला. याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून खेवारे महाज ह्या केंद्र शाळेने एक नविन आदर्श जगासमोर ठेवला.

या शाळेच्या व्यवस्थापन समिती व शिक्षकांने एक नवा उपक्रम राबवीत कोणत्याही मोठ्या नेत्याला ध्वज रोहनाला आमंत्रित न करता गावातील १२वि मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थी कू. पूनम दामोदर ठोंबरे हिच्या हस्ते ध्वज फडकावला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरुण अनंत शेलवले, केंद्र प्रमुख मधुकर उमाकांत मोहपे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष काळूराम म्हाडसे, उपाध्यक्ष विश्वास विठ्ठल सुरोशे इत्यादी सर्व सदस्य शिक्षक व्रृंद जिल्हा परिषद केंद्र शाळा खेवारे महाज उपस्थित होते.
असाच खेवारे महाज शाळेचा आदर्श घेऊन सर्व ठिकाणी ध्यज रोहन करण्यासाठी गावातील गुणवंत विध्यार्थ्यांना मान दिल्यास शिक्षण क्षेत्रात विध्यार्थ्यामध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण होण्यास प्रेरणा मिळेल. असे ह्यावेळेस प्रतिपादित करण्यात आले,
news ब्युरो सचिन सुरोशे, धसई-ठाणे


0 टिप्पण्या