Advertisement

कन्हान येथे गाव पुजा संपन्न:महिलांनी शितला माता मंदिरात केली पुजा अर्चना

कन्हान येथे गाव पुजा संपन्न:महिलांनी शितला माता मंदिरात केली पुजा अर्चना

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथील महिलांनी होम पाईप कंपनी मध्ये असलेल्या शीतला माता मंदिर जाऊन पुजा अर्चना करुन व भजन कीर्तन करुन गाव पुजा संपन्न करण्यात आली .

महिलांनी परिसरातुन ढोल ताश्याचा गजरात होम पाईप कंपनी मध्ये असलेल्या शीतला माता मंदिरा पर्यंत यात्रा काढण्यात आली असुन मंदिरात महिलांनी विधिवत पूजा अर्चना करून व भजन कीर्तन करुन गाव पुजा संपन्न करण्यात आली .

या प्रसंगी भजन मंडळाचे अध्यक्ष वनिता कावळे , मेहरकुळे ताई , रंजना भोयर , शारदा शिवरकर , उषा बंड , सुनम शेंडे , विना हुड , घोडमारे ताई , वनिता चकोले , शर्मा ताई , चाचणे ताई , सुनिता वाडीभस्मे , चिचखेंडे ताई , लता उन्हाळे , तितरमारे ताई , पाहुणे ताई सह आदि महिला उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या