जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रणमोचन येथे हर घर झेंडा जनजागृती उपक्रम
ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे 30 जुलै ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा जनजागृतीपर बॅंड पथकासह रणमोचन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व गावात जनजागृती पर उपक्रम राबविण्यात आली.
यावेळी गावातील सरपंच नीलिमा राऊत. उपसरपंच सदाशिव ठाकरे. शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे उपाध्यक्ष रेशम शेंभरकर पोलीस पाटील अस्मिता पिलारे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे शाळेतील अंगणवाडी कार्यकर्ती लक्ष्मीबाई दोनाडकर मुख्याध्यापक झुरमुरे सर, रामटेके सर, किरमिरे सर शिक्षिका अनुज खोब्रागडे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंड्यावर आधारित घोषवाक्य आणि देशभक्तीपर गीत गावुन जनजागृती केली


0 टिप्पण्या