Advertisement

कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रात रस्त्याची ऐसी तैसी

कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रात रस्त्याची ऐसी तैसी

वाळू व इतर मोठं मोठ्या भरधावं वाहणाने मुख्य रस्त्याची दैनावस्था

ब्रम्हपुरी –
नागरिकांना स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न पाहणे सहज आहे तर तसे स्वप्न दाखवत, शहराच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असल्याचे शब्द देतं प्रसंगी मुद्रंकावर लेखी आश्वासन सुद्धा देतं नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करणाऱ्या कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रातुन रात्र भर सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करी व इतर मोठं मोठ्या भरधावं वाहणाच्या वर्दळीने वार्डातील मुख्य रस्त्याची मोठी दैनावस्था झालेली आहे.

राजकारणात मोठा वजन व आर्थिक बाजू भक्कम असलेल्या उमेदवारांना मतदार राजा निवडणुकीच्या पटलावर बरेचदा अर्थकारणाने प्राधान्य देतं एकहाती सत्ता देतं असल्याचे शहरातील राजकारणात नेहमीच दिसून येते.
सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात असलेला त्यांचा तोरा व भक्कम आर्थिक बाजूने सर्वसाधारण मतदारांना भुरळ पाडत साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर सत्ते साठी करतांना आढळून येतात. सत्ता येते मात्र सर्वसाधारण नागरिकांच्या अपेक्षेचे, त्यांच्या भागातील विकासाचे, दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडत पुढील पाच वर्ष नागरिकांना वनवास झाल्याचा अनुभव मात्र नक्की येतो.

शहरातील कुर्झा वार्डातील मुख्य रस्ता व समता कॉलनी कडे जाणाऱ्या मार्गाची झालेली दुरव्यवस्था व दुरुस्तीची जबाबदारी कुणाची.. या तारांकीत प्रश्नात आता स्थानिक नागरिक गुंतले असून नागरिकांच्या मार्गात आलेल्या रस्त्याच्या गुंतवळ्याचा गंभीर विषय स्थानिक मातब्बर लोकप्रतिनिधी सोडवणार अथवा वाढवणार हे आता येणारा काळचं ठरवेल.
तर असे नेहमीच सुरू असल्यास एक दिवस मात्र मतदार राजा जागृत होऊन विकासाचे सारथी म्हणून स्वतः पुढाकार घेऊन योग्य उमेदवारला पसंत करून नगर परिषद चे सभागुहामध्ये त्यांचे नेतृत्व व विकास कामे करण्यास धाडतील हे नाकारता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या