कन्हान नगरीत आमदार आशिष जयस्वाल यांचे शिवसैनिकांनी केले स्वागत
शिवसैनिक पदाधिकार्यांन मध्ये उत्साह चे वातावरण
कन्हान – राज्यात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकी झाल्यानंतर राजकारणा मध्ये मोठा भुकंप आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन बंडामध्ये उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपा समर्थित शिंदे सरकार स्थापित झाले असुन या सरकार ला रामटेक विधानसभा क्षेत्रातुन अपक्ष निवडुन आलेले आमदार आशिष जयस्वाल यांनी पांठिबा दिला आहे .
मंगळवार ला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांचे कन्हान नगरीत आगमन होताच आंबेडकर चौक येथे आमदार श्री आशिष जयस्वाल प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडक
र यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले . त्यानंतर शिवसेना कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांच्या नेतृत्वात आमदार आशिष जयस्वाल यांच्या ढोल ताश्याचा गजरात , फटाके फोडुन , मिठाई घालुन , व पुष्प गुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले .

कन्हान-पिपरी नगर परिषद कन्हान शहर च्या नगरध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर, नगर सेवक श्री अनिल ठाकरे, नगर सेविका सौ. मोनिका पौनीकर, शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर, शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे, शिवसेना महिला शहर प्रमुख मनीषा चिखले, भारत पगारे, संजय शेंद्रे, चिंटू वाकुडकर, प्रदीप गायकवाड, अजय चव्हाण, हरीश तिकडे, समशेर पुरवले, अर्जुन पात्रे,गणेश भालेकर, अरुण खडसे, प्रीतम शेंडे, वैशाली श्रीखंडे, लीना हारोडे, वनिता मेश्राम, लता लुंढुरे,शुभांगी घोगले, जोशीला उके,कुंदा मोटघरे,इंदिरा कुर्मी,निक्कू पिल्ले,शारुख खान, सनी सिंह, मनीष सिंह, राजन सिंह, दीपक सिंह, रजनीश शिंह, रवी गिरी, तसेच मोठ्या संखेनी शिवसेना कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी ऋषभ बावनकर, कन्हान-नागपूर


0 टिप्पण्या