कन्हान येथे भाजपा द्वारे विजय जल्लोष साजरा
ओबीसी समाजा मध्ये व भाजपा कार्यकर्तां मध्ये उत्साह चे वातावरण
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महाविकास आघाडी सरकारने प्रदीर्घ लढा देऊन ही ओबीसी राजकीय आरक्षण मिळविण्यात तत्कालिन सरकारला यश आलं नसुन शिंदे-फडणवीस जोडीने सत्तेत येताच पहिली मोठी लढाई जिंकुन ओबीसा समाजाल सर्वोच न्यायालयातुन न्याय मिळुन देल्याने आणि राष्ट्रपती पदाकरिता एनडीए चे उम्मेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू हे प्रचंड बहुमतांनी विजय झाल्याने कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी भारतीय जनता पार्टी चा विजय असो असे जयघोष करीत विजय जल्लोष साजरा केला .
गेली अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेत आल्यानंतर १३ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करून इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले असुन १५ महिने सरकारने ओबीसी आयोग गठित केला नसुन ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही. १५ महिने महाविकास आघाडी सरकारने टाइमपास केला. ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण स्थगित केल . त्यानंतर ही आघाडी सरकार ने प्रयत्न केले नाही . आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात भाजपा समर्थित शिंदे सरकार स्थापित झाल्याने लगेच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षण बाबत बांठिया आयोगाबद्दलची माहिती घेतली व त्यांच्या मागे लागून ११ तारखेला शिंदे सरकार ने अहवाल सादर केला. सुनावणीसाठी सरकारची बाजू मांडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे सॉलिसीटर तुषार मेहता यांची भेट घेतली. मध्य प्रदेश सरकारप्रमाणे आमचीही बाजू मांडण्याची विनंती त्यांना केली. त्यांनी बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाने अहवाल स्वीकारून ओबीसी राजकीय आरक्षण लागू केले . तसेच देशातील राष्ट्रपती पदाकरिता एनडीए चे उम्मेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी विपक्ष चे उम्मेदवार यशवंत सिन्हा यांना भारी मतांनी हारवुन राष्ट्रपती निवडणुक जिंकल्याने कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात ढोल ताश्याचा गजरात , गुलाल उडळुन , फटाके फोडुन , नागरिकांना मिठाई वाटप करुन भारतीय जनता पार्टी चा विजय असो असे जयघोष करीत विजय जल्लोष साजरा केला .
या प्रसंगी सुनिल लाडेकर , राजेंद्र शेंदरे , कामेश्वर शर्मा , अमोल साकोरे , विक्की सोलंकी , रवि महाकाळकर , भरत सावळे , संजय चोपकर , गुरुदेव चकोले , शिवाजी चकोले , रिंकेश चवरे शैलेश शेळके , विनोद किरपान , ऋषभ बावनकर , रणजीत शिंदेकर , सचिन वासनिक , सौरभ पोटभरे , आकाश वांडणकर , हितेश साठवणे , लोकेश आंबाळकर , तुलेषा नानवटकर , सुषमा मस्के , प्रतीक्षा चवरे , सुनंदा दिवटे , अनिता पाटील , संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर , लक्ष्मी लाडेकर , सुनिल आगुटलेवार , नारायण गजभिए , विनोद कोहळे , चंद्रगुप्ता पानतावणे , सुरेंद्र चटप , भगवान सावरकर , मारुती बावणे , दिनेश खाडे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .


0 टिप्पण्या