Advertisement

शेतीच्या कामावर गेले असता दोन आरोपी ने लाकडी दंड्याने माराहन करुन केले जख्मी

शेतीच्या कामावर गेले असता दोन आरोपी ने लाकडी दंड्याने माराहन करुन केले जख्मी

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पो.स्टे. ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर असलेल्या खेडी(खोपडी) शिवारात दोन आरोपीतांनी फिर्यादी यांच्या लहान भावाला व मोठ्या भावाच्या पत्नीला लाकडी दंड्याने पायावर व हातावर माराहण करुन जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी उमेश पुडलींग वैद्य वय ५३ वर्ष राहणार खेडी (खोपडी) कन्हान यांची खेडी (खोपडी) शिवारात तीन एकर शेती असुन त्या शेती मध्ये तीन भाऊ व दोन बहीणी असे हिस्से आहे व ती शेती उमेश वैद्य सह सर्व मिळुन करीत असुन उमेश वैद्य यांचा शेताच्या बाजु चे शेत १) संतोष ज्ञानेश्वर काळे २) मंगेश ज्ञानेश्वर काळे यांची शेत लागुन आहे व त्या शेती बाबद कोर्टात केस सुरु आहे . पण शेती चे ७१२ वर उमेश वैद्य यांचे सह पाच ही भाऊ बहिणे चे नाव असुन मिळुन शेती करतात.

मंगळवार दिनांक २६ जुलै ला अंदाजे दुपारी १२४५ वाजता च्या दरम्यान उमेश वैद्य सह सर्व मिळुन शेती चे काम करण्याकरिता आपल्या शेतात गेले असता आरोपी १) संतोष ज्ञानेश्वर काळे २) मंगेश ज्ञानेश्वर काळे दोन्ही राहणार खेडी (खोपडी) कन्हान यांनी उमेश वैद्य व त्याचा लहान भाऊ नामदेव आणि त्यांचा मोठ्या भावाची पत्नी नामे आशा दिलीप वैद्य यांना लाकडी दंड्याने पायावर व हातावर माराहण करुन जख्मी केले व शिवीगाळ करुन पुन्हा या शेतावर काम करत दिसल्यास सर्वांना जिवाने मारुन टाकीन असे बोलुन धमकी दिली . उमेश वैद्य यांना व त्यांचा बहीन भाऊ ला १) संतोष ज्ञानेश्वर काळे २) मंगेश ज्ञानेश्वर काळे यांचा पासुन जीवाला धोका असल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी उमेश वैद्य यांचा तोंडी रिपोर्ट वरून आरोपी १) संतोष ज्ञानेश्वर काळे २) मंगेश ज्ञानेश्वर काळे यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक ४४३२२ कलम ३२४ , ५०६ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या