ब्रह्मपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा – गुरुदेव भक्त नामदेव ठेंगरी ( आदर्श टेलर ) यांची मागणी
ब्रम्हापुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने धान, कापूस, सोयाबीन, तूर, अशा पैसे मिळवून देणाऱ्या पिकांसह पालेभाज्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आदर्श टेलर नावाने परिचित असणारे गुरुदेव भक्त नामदेव ठेंगरी, यांनी केली आहे.
अतिवृष्टीच्या पावसामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओला दुष्काळाचे चिन्ह निर्माण झाले आहे,
मोठ्या प्रमाणात भात पिकात पाणी आल्याने शेतकऱ्यांची धानाचे परे कुजून गेली. यामुळे शेतकरी राजा यावर्षी पाऊस पडूनही दुःखी आहे. यंदा जुलै महिन्यापासून सुरु झालेला पाऊस अजून थांबायला तयार नाही. त्यामुळे बंधारे, तलाव, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. व अनेक ठिकाणी घरे व पिकेसुद्धा अति पावसामुळे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी सोयाबीन, धान, कापूस, तुर ही पिके मोठ्या प्रमाणात करतात. ही पिके अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली असून तीबार पेरणीची स्थिती निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी शेतीच्या खर्चाने अक्षरशः कर्जबाजारी होत चालला आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी. व ब्रह्मपुरी तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी गुरुदेव भक्त नामदेव ठेंगरी ब्रह्मपुरी यांनी केली आहे.


0 टिप्पण्या