वन्यप्राण्याच्या भ्रमण मार्गात अडथळा आनण्याचा प्रयत्न केल्यास होणारं कारवाई!
ब्रम्हपूरी-
तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सायगाटा जंगल परीसरात वाघाचा भ्रमंतीचा मार्ग असुन सदर परीसरात वनविभागा मार्फत चमु तयार करुन बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जेणेकरुन वन्यप्राण्याला ब्रम्हपूरी ते नागभीड राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कोणत्याही प्रकारची दुर्घटणा होणार नाही. सदर वाघांचा वनविभागा मार्फत नियमीत पणे मागोवा तसेच गस्ती करण्यात येत असुन वनविभाग त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर व सनियंत्रण ठेवून आहे.
वनविभाग व पोलीस विभागा मार्फत जनतेस आव्हाण करण्यात येते की, सायगाटा जंगल परीसरात वाघाचा वावर असल्याने जनतेने सदर परीसरात येवुन वन्यप्राण्यास अडथळा निर्माण करु नये व परीसरात जाण्याचे टाळुन सहकार्य करावे. वन्यप्राण्याचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. वनविभाग वन्यप्राण्याचे संरक्षण करण्यास तत्पर आहे. वन्यप्राणी यांना रोड क्रॉस करण्याकरीता अंडरपास तयार करण्याकरीता नॅशनल हाईवे अथॉरिटी तर्फे कार्यवाही चालु आहे.
आणी लवकरात लवकर अंडरपास तयार करण्याचे काम सुरु होणे अपेक्षीत आहे. सायगाटा जंगल परीसरात वाघाचा वावर असल्याने सदर परीसरात कोणतेही वाहन विनाकारण थांबवुन वन्यप्राण्याच्या भ्रमण मार्गात अडथळा आनण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनीयम 1972 व भारतीय वन अधिनीयम 1927 अन्वये कार्यवाही करण्यात येईल


0 टिप्पण्या