आजी-माजी सैनिकांचे व शहीद परिवारांचे प्रश्न तशिलदार काशिनाथ पाटील यांच्या समोर मांडली माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होत असलेल्या आजादी का अमृत महोत्सव याची जागृती करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत दिनांक 1507 2022 रोजी मुखेड तहसीलदार कार्यालय मध्ये राबविण्यात आले…त्यामध्ये आजी व माजी सैनिक तसेच शहीद परिवारांच्या स्थगित असणाऱ्या जे काही समस्या आहेत त्यामध्ये…महसूल कार्यालय, कायदा व सुव्यवस्था, नगर प्रशासन, महानगरपालिका, शिक्षण आरोग्य ,माजी सैनिक पुनर्वसन ,पंचायत समिती… यासारख्या अनेक समस्या.

माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे पाळेकर यांनी शासन व प्रशासना समोर मांडले….
त्यावर..सीमेवर आमचे रक्षण करणाऱ्या सर्व आजी माजी व शहीद परिवारांच्या जे काही समस्या आहेत ते आम्ही शक्य होईल तेवढं लवकर सोडण्याचा प्रयत्न करू…आणि हा अमृत महोत्सव अभियान जरी संपला तरी आम्ही अशा प्रकारचे यापुढेही सैनिकासाठी कार्य करत राहू असे मुखेड तालुक्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील साहेब यांनी बोलत असताना आश्वासन दिले आहेत … सैनिक हे सीमेवर असल्याने त्यांना गावाकडे पुरेसा वेळ मिळत नाही त्यासाठी त्यांच्या परिवाराला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात , त्यासाठी आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने आजी-माजी सैनिक व शहीद परिवारांचे कामे तात्काळ आणि प्रायरिटेने करून त्यांना न्याय द्यावे अशी विनंती मुखेड येथील
राजे छत्रपती अकॅडमी…
सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक….माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे पाळेकर यांनी बोलत असताना केली….उपस्थितीमध्ये…
,मुख्याधिकारी धनंजय थोरात, कृषी अधिकारी भरत नागरे, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक एस बी सरोदे, तहसील कार्यालय सहाय्यक प्रशांत लिंबेकर, भूमी अभिलेख सहाय्यक लोखंडे बीसी ,पुढाकार 24 तास सोबत प्रतिनिधी प्रशांत पवित्रे.


0 टिप्पण्या