पत्रकार आक्रमक पिंपळगाव घाटातील अवैध वाळूचा टिप्पर जप्त ड्रायव्हर पसार
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाची कारवाई, प्रशासनाची दिरंगाई
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरीच्या सदस्यानी पिंपळगाव वाळू घाटावरून अवैध वाळू वाहतूक करीत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला रॉयल्टीची विचारणा केल्यास रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना फोन करून याबाबत माहिती दिली असता उपविभागीय अधिकारी यांनी पाठवतो असे उत्तर दिले मात्र बराच वेळ होऊनही कोणीही आले नसल्यानें पुन्हा फोन केला असता तहसीलदारांना सांगितले, मी बाहेर आहे असे सांगून टाळण्याचे दूस्टिने लगेच फोन कट केला.
खुप वेळ होऊनही महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे कडून सदर कार्यवाहित दिरगाई होत असल्याचे समजल्याने पोलीस विभागाच्या ११२ नंबर वर फोन करून माहिती दिल्याने वेळेवर का होईना घटना स्थळी येऊन पोलिसांनी रॉयल्टी तपासणी केली.
रॉयल्टी वाळू घाट येथील दिवाणजी यांनी वेळेवर २.३० वाजताची वेळ टाकून पोलिसांना दाखविण्यात आले मात्र त्या वेळी ट्रक ड्रायव्हर पसार झाले होते तर त्यावेळी वाळूघाटाच्या दिवाणजी कडे रॉयल्टि आली कुठून हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
घटनास्थळी जेव्हा ट्रॅक ड्रायवर यांना रॉयल्टी बाबत विचारणा केली तेव्हा १५० वाजले होते तर रॉयल्टी ही २.४३ ची वेळ नोंद केलेली आले.
सदर प्रकरण थांबविण्यात यावे या बाबत केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरीचे सदस्य यांचेवर दबावही येत होते.
# घन कचरा व्यवस्थापनातील ट्रक अवैध वाळू वाहतूकित #
( विशेषतः ट्रॅक हा ON DUTY NMC घन कचरा व्यवस्थापन असे लिहलेले प्रिंटेड पाम्लेट लावलेला असातांना वाळूची वाहतूक अशी काय सुरू आहे. हे तपासण्याची गरज असून घनकचरा व्यवस्थापन शी संबंधित विभागाने कार्यवाही अपेक्षित आहे.)



0 टिप्पण्या