डॉ .मनोहराराव टेभुरकर खोरीपा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती
ब्रम्हपुरी-रिपब्लिकन पक्ष खोरीपा जिल्हा अध्यक्ष पदावर डॉ. मनोहराराव टेभुरकर तळोधी तालुका नागभीड यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र प्रा डॉ देवेश कांबळे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश खोरीपा यांनी नुकतेच दिले आहे,ह्यावेळी प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद मेश्राम सोबत होते, डॉ तेंभुरकर यांच्या नियुक्ती मुळे चिमूर, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवचेतना मिळेल कारण वैद्यकीय सेवा करीत असताना ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्कात सतत असल्याने १९९० मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना२४हजार मतदान घेऊन दुसरा क्रमांक होता मात्र सतत रिप. काँग्रेस युती मुळे रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीत अडसर होत गेली आता मात्र पुन्हा रिपब्लिकन पक्ष नव्या जोमाने गती प्राप्त करेल अशी अपेक्षा देवेश कांबळे यांनी नियुक्ती पत्र देतांना व्यक्त केली.



0 टिप्पण्या