Advertisement

महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा- गणपत वारगडा

महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा- गणपत वारगडा

पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिले पञ..

पनवेल महानगरपालिकेचे असणारे देहरंग धरणामध्ये स्थानिक आदिवासींच्या अनेक जमिनी कवडीमोल दरात संपादीत केल्या, माञ या आदिवासींना अद्यापही प्रकल्पग्रस्थ म्हणून दाखले देण्यात आलेले नाहीत. शिवाय, महापालिकेत नोक-या देखील दिल्या नाहीत. म्हणून स्थानिक काही आदिवासी बांधव १ ते २ ब्रास रेती काढून आपले उदरनिर्वाह करत असतात. शिवाय, काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सांगण्यावरून महसूल विभागाच्यामार्फत या स्थानिक आदिवासींवर ३ ब्रास रेती ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले गेले होते.

परंतु, याच देहरंग धरणामध्ये महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीररित्या अनेक व्यावसायिकांनी हजारो ब्रास माती उत्खन्न केले आहे. एवढं नाही तर या काही व्यावसायिकांनी महापालिकेच्या जागेतच माती स्टोक केले असल्याचे समजताच पनवेल तहसील महसूल विभागाच्या अधिका-यांकडून दि. १६ जून २०२२ रोजी अचानक स्थळ पाहणी करण्यात आली. या स्थळ पाहणीत जे.सी.बी., ट्रक, हायवं, ट्राक्टरसह यंञण ताब्यात घेण्यात आली आहेत.

त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या विना परवानगी व बेकायदेशीरित्या माती उत्खन्न करून माती स्टोक करणा-यांवर आदिवासी बांधवांप्रमाणेच या व्यावसायिकांवर देखील कारवाई करावी, यासाठी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा, संजय चौधरीसह अन्य आदिवासी बांधवांनी तहसीलदार विजय तळेकर व पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना पञ देऊन मागणी केली आहे.

प्रतिनिधी, किरण कारभळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या