नागरिकांच्या मारहाण करणाऱ्या सहा.पोलिस निरिक्षक विवेक सोनवाने यांच्यावर कार्यवाहीची मागणी
पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यास आलेल्या फिर्यादीलाच मारहाण
व्यापारी मंडळ व पेट्रोल पंप असोसिएशन च्या मागणीवर सोनवाणे पोलीस नियंत्रण कक्ष येथे बदली
रामटेक – दि.१९ जुलै २०२२ मंगळवार रोजी शितलवाडी येथिल पेट्रोल पंपावर दोन इसमांनी दगडफेक करुन पेट्रोल पंपचे मोठे नूकसान केले होते. या घटनेची तक्रार करण्याकरिता पेट्रोल पंप चालक सपन जयस्वाल, व यांच्यासह शुभम जयस्वाल, लकी चौकसे पोलिस स्टेशन रामटेक येथे गेले असता, आधी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिल्या गेले. त्यावेळी तक्रारकर्ते परत जात असतांना सहाय्यक पोलिस निरिक्षक विवेक सोनवाने यांनी तिथे येवून काहीही विचिरपूस न करता फिर्यादींना अश्लील शिविगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस ते दारू पिऊन असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. ही सर्व घटना पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही मध्ये देखील रेकॉर्ड झालेली आहे.

त्यानंतर उपरोक्त घटनेची माहिती रामटेकचे आमदार अॅड.आशिष जयस्वाल यांना देण्यात आली. त्यांच्या हस्तक्षेपामूळे पेट्रोलपंपावरील घटनेची तसेच सोनवाने यांच्याकडून शहरातील प्रतिष्ठित नागरिकाला मारण्याच्या प्रकरणाची पो.स्टे.रामटेक येथे तक्रार नोंदविण्यात आली. फिर्यादी सोबत घडलेल्या या घटनेमूळे सामान्य नागरिकांमध्ये व रामटेक व्यापारी मंडळामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
त्यामूळे रामटेक व्यापारी मंडळाने अशा दबंग व गर्विष्ट प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठी सहा.पो.नि.सोनवाने यांच्यावर निलंबन व आर्थिक झड पोहचविणारी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यानूसार पोलिस अधिक्षक नागपूर जिल्हा ग्रामिण यांच्याकडून सहा.पो.नि.सोनवाने यांची तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली आहे. परंतू याव्यतिरिक्त देखिल विवेक सोनवाने यांच्या विरोधात नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी आहेत.
मौदा तालूक्यातील पोलिस स्टेशन अरोली येथे कार्यरत असतांना देखील अनेक गंभिर गुन्ह्यात त्यांची संशयाद्स्पद भूमिका असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर अनेक रेती माफीया व अवैध धंदे चालविणार्या व्यक्तीसोबत घनिष्ठ संबंध असल्याची बाब सर्वांना माहितच आहे. परंतु पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांच्या भीतीपोटी अनेक नागरिक तक्रार करायला समोर येत नव्हते. परंतु त्यांच्यावर झालेल्या कार्यवाहीमुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी समोर येण्याची आशंका आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक, नागपूर जिल्हा ग्रामिण यांनी सहाय्यक पो.नि.विवेक सोनवाने यांची सखोल चौकशी करण्याकरिता रामटेक व मौदा तालूक्यातील नागरिकांची मागणी आहे.


0 टिप्पण्या