Advertisement

मृतकाच्या कुटुंबास चार लाखाचा धनादेश तहसीलदार यांच्या हस्ते वितरण

मृतकाच्या कुटुंबास चार लाखाचा धनादेश तहसीलदार यांच्या हस्ते वितरण

ब्रह्मपुरी तालुक्यात दिनांक ९ जुलैला चोरटी येथील नारायण शिवराम कांबळे वय ४६ वर्षे या इसमाचा अडयाळ जाणी येथील तलावात मासेमारी करीत असताना अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला होता.

त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

घटनेनंतर दहा दिवसातच ब्रह्मपुरी तहसील प्रशासना कडून मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत देण्यात आली. मृतकाची पत्नी रागीना नारायण कांबळे यांना ब्रह्मपुरीच्या तहसीलदार उषा चौधरी यांच्या हस्ते चार लाखाच्या धनादेशाचे वितरत करण्यात आले.

यावेळी  बोधनवार मंडळ अधिकारी, तलाठी मेश्राम, चोरटी येथील सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या