ट्रॅक्टरवच कारवाई. महसूल अधिकाऱ्यांना हायवा टिप्पर एल .पी पोकलॅण्ड दिसत नाही का.?
ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक अविरत सुरू असून महसूल विभाग जाणीवपूर्वक आर्थिक लाभातून या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या रेतीघाट मालकाकडून व ट्रक मालकाशी संगणमत करून जानिपूर्वक मोकळीक दिल्या जाते तर दिवस रात्र अ-हेरनवरगाव ( आवळी ),अ-हेर नवरगाव (पिंपळधोकडा) पिंपळगाव भोसले, हळदा, बेलगाव, कोल्लारी या घाटावरून अवैध वाळू वाहतूक सुरू असून कोणतीही कारवाई होत नसल्याने शासनाचा ८० ते९० करोड रुपयांचा महसूल बुडत आहे.? याबाबत पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन दिले असून या निवेदनाला केराची टोपली दाखवल्या जातो. दिवसाला तीनशे रुपये कमावणारा सर्वसाधारण मजूर समाधानी राहतो मात्र या अधिकाऱ्यांना सरकारी गाडी, सरकारी घर, भलमार सरकारी पगार, मिळत असून सुद्धा हे अधिकारी समाधानी दिसत नाही.


0 टिप्पण्या