जेवनाचे एंडवास मागितल्या ने आरोपी ने गालावर चाकु ने वार करुन केले गंभीर जख्मी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पो.स्टे. ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस एक किमी अंतरावर असलेल्या प्रगती नगर कन्हान येथे जख्मी फिर्यादी रोहित बोरकर ह्याने आरोपी ला जेवनाचे एका महिन्याचे २,००० रुपए मागितले असता आरोपी साजिद शेख ह्याने रोहित बोरकर याचा गालावर चाकु ने वार करुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी रोहित सुधाकर बोरकर वय २२ वर्ष राहणार प्रगती नगर कन्हान हा साई प्रसाद काॅलेज येथे बीए २वर्ष चे शिक्षण घेत असुन जेवनाचे डब्बा देण्याचे काम करतो .
सोमवार दिनांक २५ जुलै ला रात्री अंदाजे ९४५ वाजता च्या दरम्यान रोहित बोरकर व त्याचे दोन माम भाऊ हे गणेश नगर येथे खैरकर यांच्या घरी किरायणे राहणारा आरोपी साजिद शेख राहणार गणेश नगर कन्हान यांचा घरी डब्बा देण्याकरिता गेले होते व जेवनाचे एका महिन्याचे २००० रुपए एंडवास मागितले तर आरोपी साजिद शेख याने आपल्या पॅंन्ट च्या खिश्यातुन एक चाकु कांडला व रोहित बोरकर याचा पाठीला मारायला मागुन आला पण रोहित बोरकर ने त्याचा हात पकडुन आपला जीव वाचविण्याचा प्रत्यन केला असता साजिद शेख ह्याने रोहित बोरकर याचा डाव्या गालाचे वर चाकु ने वार करुन गंभीर जख्मी केले . त्यामुळे रोहित बोरकर याचा गालातुन रक्त निघाले व तोंडातील खालच्या बाजुचा दाट तुटल्याने खाजगी रूग्णालयात जाऊन उपचार घेतला .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी रोहित बोरकर याचा तोंडी रिपोर्ट व डॉ रिपोर्ट वरून आरोपी साजिद शेख विरुद्ध अपराध क्रमांक ४४६२२ कलम ३२६ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या