व्हॉट्सॲप चॅटिंग मधून तहसीलदारांची चॅटिंग चर्चा गुणगान कमी , आरोपांवरच अधिक भर !
ब्रम्हपुरी -भ्रमनध्वनी वरील सोशल मीडिया सध्या सर्वांच्या जवळीक तथा महत्वाचा विषय !
सध्या ब्रम्हपुरी तालुक्यात अवैध वाळू तस्करीचा खेळ मोठ्या जोरात सुरु असून या वाळू तस्करीत राजकिय क्षेत्रातील दिग्गज नेत्या पासून त्यांच्या चेलेचेपत्यांची संख्या मोठी आहे. या वाळू तस्करांना महसूल अधिकारी कर्मचारी तसेच संबंधीत सर्व विभागाची साथ असल्यानेच हा वाळू तस्करीचा खेळ मोठ्या प्रमाणात दिवस रात्र अविरत पणे सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

सध्या ब्रम्हपुरीत बऱ्याच संख्येने पत्रकार असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुप वर ब्रम्हपुरी येथील तहसिलदार उषा चौधरी याच्या कार्य प्रणाली बाबत जोरदार चॅटिंग चर्चा सुरू असून या मॅडमचे गुण गान कमी मात्र आरोपातच अधिक भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
एका पत्रकाराने मॅडमची पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या दोन चार गावाचा संदर्भ घेत खूप मोठा तीर सोडल्या गत! जसे काही सम्पूर्ण तालुकाच भ्रमण केले की काय अशी बातमी बनवून प्रसिद्ध केली.
त्यामूळे या मॅडमच्या कार्य प्रणाली बाबत, सर्वांना त्यांच्या स्वभावाची जाणीव असल्याने व्हॉट्सॲप ग्रूप मधील सदस्यांमध्ये जोरदार चॅटिंग सत्र सुरू झाले. चॅटिंग सत्र सुरु असताना या नाट्यमय घडामोडीत बऱ्याच सदस्यांना रेमुव्ह केल्या गेले व नंतर ॲड केल्या गेले.
या ग्रुप मध्ये ५०० च्या वर सदस्य असुन पत्रकार, शिक्षक, राजकिय क्षेत्रातील, सामाजिक कार्यातील सदस्य मंडळी आहेत. या घडामोडीत काही सदस्यांना चॅटिगच्या वाचनातून मॅडमची सर्व कार्य प्रणाली आपोआपच अणुभवास मिळाली असावी असे समजायला हरकत नसावी.
तालुक्यातील लाडज हा गाव नदीने चौफेर गाठले आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तालुक्यात सर्वप्रथम लाडज गावाची सर्व नागरिक आठवण करतात. मात्र या गावात तहसीलदार यांनी पाय ठेवणे तर दुरच !लाडज या गावाची आठवण तरी झाली काय हा प्रश्न लाडजवासी यांचे सह सम्पूर्ण ब्रम्हपुरी तालुक्यात निर्माण झाला आहे .


0 टिप्पण्या