कन्हान-पिपरी शहरातील गॅस उपभोक्तांना गॅस एजन्सी मार्फत अपूर्ण सेवा, घरपोच सेवा उपलब्ध नाही: कन्हान-शहर नगरअध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर
कन्हान :- कन्हान पिपरी शहरातील गॅस उपभोक्तां गॅस बुकिंग करतांना त्यांचा कडून सर्व प्रकारचे कर लादले जातात आणि त्यानंतर वेळेत उपभोक्तांना रिफील केलेले गॅस सिलेंडर त्यांना घरपोच करून देणे हे कार्य गॅस एजन्सी यांचे असते.
गॅस एजन्सी मार्फत वेळेत सेवा प्रदान केली जात नाही व अपूर्ण सेवा प्रदान केली जात आहे, जसे उपभोक्तांना घरपोच सेवा दिली जात नाही. उपभोक्तांना त्यांचा गोडाऊन पर्यंत जाऊन रिफील केलेले गॅस सिलेंडर घ्याला जावे लागते.
तसेच उपभोक्तां गॅस बुकिंग करतांना त्यांचा कडून जे कर लादले जातात त्यांना (रिबीट) परतावा करीत नाही. असा अनेक समस्यांना उपभोक्तांना सामोरे जावे लागत आहे. कन्हान शहरात एकूण २ गॅस एजन्सी आहेत. १) कोठारी ब्रदर्स, २) तिवारी अँड कंपनी आहेत. शासनाचे आदेश असून सुद्धा उपभोक्त्यांना वेळेवर गैस मिळत नाही आणि घरपोच सेवेचे आदेश असून सुद्धा अध्यापही उपलब्ध झाली नाही.
इत्यादी बाबींचा विचारणा व त्यानुषंगाने कन्हान-पिपरी शहरातील गॅस एजन्सी बाबत चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन सादर करून, विनंती कन्हान शहर च्या नगर अध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.


0 टिप्पण्या